Home Maharashtra फोकणाड्या बाता नेरी वाशियांची पाणी समस्या दूर करणार काय? — अर्ध्या...

फोकणाड्या बाता नेरी वाशियांची पाणी समस्या दूर करणार काय? — अर्ध्या रात्री तहान भागवण्यासाठी लागतात महिलांच्या रांगा!

दिक्षा कऱ्हाडे/शुभम गजभिये.‌.

       चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमुर तालुक्यातील मौजा नेरी येथे भिषण पाणी टंचाई आहे.तरीही भिषण पाणी टंचाईकडे कोणाचेही लक्ष जात नसल्याचे विदारक चित्र मौजा नेरी वाशिय दररोज अनुभवांना दिसतात.

        पाणी ही जिवनावश्यक गरज आहे,असे असताना याकडे लोकप्रतिनिधी आणि ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी लक्ष देताना दिसत नाही.

        विकासाच्या लांबलचक बाता भाषणातून केल्या जातात आणि अशा फोकनाळ्या बाता दुर्लक्षित केल्या जातात याचा अनुभव आता नेरी वाशियांना येताना दिसतो आहे.

         ग्रामीण भागातील नागरिकांना मुबलक आणि स्वच्छ पाणी पुरवठा करण्याची नैतिक जबाबदारी महाराष्ट्र शासनाची आणि शासनाच्या संबंधित विभागाची आहे.

     असे असले तरी पाणी पुरवठा योजनांचे फलीत काहीच होताना दिसत नाही.

        अर्ध्या रात्री मौजा खांबाडा रोडवरच्या पाण्याच्या पाईपवर पाणी भरण्यासाठी मौजा नेरी येथील गोरगरीब मजुरांची रांग लागलेली असते.

        पाण्यासाठी मौजा नेरी येथील महिला व पुरुषांच्या रांगेचे दृश्य बघताना पाण्याच्या टंचाईची भयानक भिषणता लक्षात येतय.

       पिण्याचे पाणी मग ते शुद्ध असो की अशुद्ध असो ते तहान भागवण्यासाठी मिळवावेच लागते,याशिवाय मौजा नेरी वाशियांना पर्याय नाही हे वास्तव डोळ्यासमोर आले की,पोकळ घोषणांची आठवण येतय.

       गावा शेजारच्या नदीला पुर जातात,पण पाण्याचे व्यवस्थापन योग्य प्रकारे केले जात नसल्याने पाण्याची टंचाईला मौजा नेरीवाशियांना सामोरे जावे लागते आहे.

      कारण मौजा नेरी भागाला सक्षम नेतृत्व व प्रतिनिधित्व आजवर लाभले नाही.तसेच प्रशासनाचे लक्ष नाही,शासकीय कार्यालयांमध्ये मनुष्यबळ उपलब्ध नाही,पुरेसा निधी मिळत नाही,मग विकास कसा होणार?हा प्रश्न नागरिकांना सातत्याने सतावतो आहे.

           शासन प्रशासनातील जबाबदार प्रतिनिधींनी मौजा नेरी येथील पाणी समस्यांकडे लक्ष पुरवावे व या दुर्लक्षीत भागातील तहानलेल्या जनतेच्या पाणी समस्या निकाली काढावी अशी मौजा नेरी येथील जनतेची मागणी आहे‌.