उपक्षम रामटेके
मुख्य कार्यकारी संपादक
अवैध दारु विक्री करणे आणि या अवैध दारू विक्री व्यवसायाच्या माध्यमातून अनेकांना सांभाळनं फारच कठीण काम झाले असावे असे,मौजा जांभुळघाट येथील एकमेकांना मारहाण करणारे प्रकरण सांगून जातय…
चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुक्यातील मौजा जांभुळघाट येथील बाजार चौकात खुल्लमं खुल्ला देशी दारूची विक्री करणारे अवैध दुकाने आहेत.
अवैध दारुची विक्री करणाऱ्या इसमांकडे आजपर्यंत तरी भिसी पोलिसांचे लक्ष गेले नाही,हे वास्तव आहे.
मात्र,कायदेशीर किंवा बेकायदेशीर दारु विक्रीच्या दुकानात कधीकाळी अप्रिय घटना घडतेच हे मौजा भिसी व मौजा जांभुळघाट मारहाण प्रकरणावरुन स्पष्ट दिसून येते आहे.
भिसी येथील एका बार पुढे दारु पिऊन वादविवाद करणाऱ्यां युवकांना पकडण्यासाठी भिसी पोलिस गेले असता तिथे त्यांना दारु पिणाऱ्या युवकांच्या रोषाला सामोरे जाताना मारहाण आणि धक्काबुक्की झाली होती.मात्र या प्रकरणात पोलिसांचा दोष नव्हता हे खरेच!
मात्र,भिसी पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या मौजा जांभुळघाट येथे अवैध दारुची विक्री बेलगाम आहे.इथल्या अवैध दारु विक्रीकडे आणि दारुविक्रेत्याकडे लक्ष द्यायला पोलिस विभागाला अजिबात वेळ नाही असेच आजवरचे चित्र आहे.
तद्वतच पोलिसाच्या वर्दीला काळीमा फासणारी काल सायंकाळी मौजा जांभुळघाट येथे घटना घडली.
भिसी पोलिस स्टेशनच्या हद्दीत मौजा मेटेपार आहे.या मेटपार गावात लग्न समारंभानिमित्त्याने एक पोलिस आले होते.ते पोलिस दारु पिण्यासाठी मौजा जांभुळघाटला आले आणि दारु पिण्यासाठी विनामूल्य दारु देण्याचा तगादा अवैध दारू विक्रेत्यांकडे त्यांनी लावलाय.
मात्र,अवैध दारू विक्रेत्यांनी सदर पोलिसाला विनामूल्य दारु देण्यास स्पष्ट नकार दिला.विनामुल्य दारु न देण्याच्या नकाराने संतापलेल्या पोलिसांनी मारहाण करणे सुरू केले.
गावातील अवैध दारु विक्रेत्याला अयोग्य घटनाक्रमाला अनुसरून मारहाण करण्याचा पोलिसाचा अवास्तव प्रकार मौजा जांभुळघाट येथील नागरिकांना/युवकांना अमान्य झालाय आणि त्यांनी सुध्दा सदर पोलिसाला चांगलीच बत्ती दिली असल्याची चर्चा आहे…
हा घटनाक्रम भिसी पोलिसांना कळताच पोलिस उपनिरीक्षक मुकेश ढोबळे,बिट जमादार अजय बगडे हे मौजा जांभुळघाटला आले आणि घडलेल्या घटनाक्रमाची इत्यंभूत माहिती घेतली.माहितीनंतर सदर पोलिसाला मौजा मेटेपार येथे पाठविण्यात आले आणि प्रकरणाला शांत करण्यात आले.
मात्र,दारु पिण्यासाठी अकारण वादविवाद करणाऱ्या व मारहाण करणाऱ्या त्या पोलिसाला निलंबित करण्याबाबत,जनचर्चेचा विषय बनला आहे.



