Home Maharashtra विविध विषयाला अनुसरून खा.डॉ. नामदेवराव किरसान व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी...

विविध विषयाला अनुसरून खा.डॉ. नामदेवराव किरसान व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी घेतली पत्रकार परिषद..

राजेंद्र रामटेके 

विशेष प्रतिनिधी..

      गडचिरोली – चिमूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.नामदेवराव किरसान आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे गडचिरोली जिल्हा अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या उपस्थितीत विविध विषयाला अनुसरून पत्रकार परिषद घेण्यात आली.

         या पत्रकार परिषदेत गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

             त्यामध्ये रानटी हत्तीचा बंदोबस्त करण्यात यावा,नुकसान भरपाईत वाढ करून देण्यात यावी,तसेच घरकुल लाभार्थ्यांना एक हप्त्याचा हात मान्सूनपूर्व देण्यात यावा,रेती उपलब्ध करून देण्यात यावी अशा महत्त्वाच्या मागण्या करण्यात आल्या.

           गडचिरोली जिल्ह्यात रानटी हत्तींच्या उपद्रवामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.अनेक शेतकऱ्यांचे पीक व घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून,शासनाकडून अद्याप पुरेशी मदत मिळालेली नाही. 

          तसेच शेतकऱ्यांना धान बोनस मिळालेला नाही,कर्जमाफीच्या घोषणाही अद्याप अंमलात आणल्या गेलेल्या नाहीत.गडचिरोली येथे प्रस्तावित विमानतळासाठी शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहित न करता इतर शासकीय जमिनीचा वापर करण्यात यावा,अशी मागणी खासदार डॉ.नामदेव किरसान व गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केली. 

         शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास आगामी काळात काँग्रेस पक्ष तालुकास्तरावर मोठे आंदोलन उभारेल अशी माहिती जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी दिली. 

        याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष ऍड. विश्वजित कोवासे,शहराध्यक्ष सतीश विधाते,अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे,युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष नितेश राठोड,आरमोरी तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे,तालुकाध्यक्ष वसंत राऊत,धानोरा तालुकाध्यक्ष प्रशांत कोराम,परिवहन सेल अध्यक्ष रुपेश टिकले,सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष संजय चने,महासचिव घनशाम वाढई,जितेंद्र मुनघाटे,हरबाजी मोरे,प्रभाकर वासेकर,रमेश चौधरी,रविंद्र चापले,पुरुषोत्तम चिंचोलकर,भय्याजी मुद्दमवार,विपुल येलटीवार,स्वप्नील ताडाम आदी पदाधिकारी पत्रकार परिषदेला उपस्थित होते.

गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी द्वारा आयोजित पत्रकार परिषदेतील इतर मागण्या…..

       1) घरकुल लाभार्थ्यांना उपलब्ध नसल्यास शासन स्तरावरून जागा उपलब्ध करून देऊन त्यांना प्रापर्टी कार्ड  सहित घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा.

       2) कंत्राटदारांचे थकीत असलेले देयके त्वरित देण्यात यावे.

        3) सुरजागड लायड मेंटल कंपनी मध्ये आता पर्यंत किती स्थानिक युवकांना रोजगार दिले याची माहिती देण्यात यावी व स्थानिकांना प्राधान्याने नोकरी  देण्यात यावी.

         4) वृद्ध कलावंत मानधन योजनेतील थकीत मानधन त्वरित देण्यात यावे.

         5) यशवंतराव चव्हाण घरकुल योजनेचे ४४० लाभार्थ्यांची निधी तात्काळ देण्यात यावे.

          6) बिरसा मुंडा सिंचन योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विहीर योजना तसेच मागेल त्याला विहीर रोजगार हमी योजना अंतर्गत सिंचन विहिरचे अनुदान तात्काळ द्यावे. 

          7)शासकीय धान खरेदी केंद्रात विक्री करणाऱ्या शेतकऱ्याना तातडीने धानाचे चुकारे देण्यात यावे.

         8) शेतकऱ्यांना सोलरकृषी पंप अनिवार्य न करता त्यांना विद्युत कृषी पंप चा पर्याय देण्यात यावा.

          9) कुरखेडा , कोरची, वडसा यथील शेतीकरिता देण्यात येणाऱ्या विद्युत चा व्होलटेज वाढवून, सद्या सुरु असलेल्या लोड शेडींग च्या वेळेचे योग्य नियोजन करण्यात यावे.

           10) भेंडाळा त.चामोर्शी परीसरातील MIDC करिता प्रस्तावित अतिरिक्त क्षेत्र स्थापना करण्याकरिता शासनाने अवलंबिलेले धोरण शेतकऱ्याला देशोधडीला लावणारे असून शेतकर्यांशी चर्चा केल्याशिवाय जागा अधिग्रहीत करू नये.

           11) रोजगार हमी योजना, घरकुल सारख्या विविध योजनातील थकीत असलेले अनुदान लाभार्थ्याना त्वरित देण्यात यावे.

           12) सुरजागड येथे चालणाऱ्या जड वाहतूकीमुळे अपघात व प्रदूषनाचे प्रमाण वाढत चालले असून त्यामुळे स्थानिक नागरिकांना दैनंदिन जीवनात नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने त्यावर प्रभावी उपाय करण्यात यावे.

          13) राष्ट्रीय व राज्य महामार्गची तातडिने दुरुस्ती करण्यात यावी.

        14)  जिल्ह्यातील शासकीय कार्यालयातील रिक्त पदाची तातडीने भरती करण्यात यावी…

         15) राज्याचे मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र जी फडणवीस यांनी महिन्यातून किमान 2 दिवस जिल्ह्यासाठी देऊन जिल्ह्यातील जनतेच्या समस्या ऐकून घ्याव्यात.