शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी..
चिमूर :- ट्रायसेम हातपंप दुरुस्ती कर्मचारी चंद्रपूर जिल्ह्यात अल्पशा मानधन वर कार्यरत असून जिल्हा परिषद आस्थापना नियमित करण्याची मागणी करीत असताना,त्याकडे चंद्रपूर जिल्हा परिषद प्रशासन दुर्लक्ष करीत असल्यामुळे हातपंप कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.
ट्रायसेम हातपंप कर्मचाऱ्यांना जिप नियमित आस्थापना वर करण्याची मागणी करीत केली आहे.न केल्यास २० मे पासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र हातपंप यांत्रिकी कर्मचारी संघटना नाशिक शाखा जिल्हा चंद्रपूरच्या वतीने संबंधित प्रशासनाला दिलेल्या निवेदनातून केला असल्याची माहिती अध्यक्ष मुकेश दुर्गपाल यांनी दिली.
चंद्रपूर जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा (यांत्रिकीविभाग ) अंतर्गत जिल्ह्यात ६२ कर्मचारी विविध तालुक्यात मागील ३५ वर्षा पासून कार्यरत आहे.
त्यांना तटपुंजे वेतन देऊन त्यांचे कडून कामे करून घेत आहे.ग्रामीण भागाचा पाणीपुरवठा योग्य रित्या करीत असताना शासकीय सेवेत सामावून घेण्या बाबत सातत्याने अन्याय झालेला आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यात हातपंप दुरुस्ती कर्मचाऱ्यांना आस्थापने वर घेतले आहे.परंतु जिल्हा परिषद चंद्रपूर मात्र दुर्लक्ष करीत आहे.चंद्रपूर जिल्हा परिषद यांनी हातपंप कर्मचाऱ्यांना आस्थापने वर न घेता फक्त निधी उपलब्ध करून देण्यासाठी पत्रव्यवहार करीत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील हातपंप कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद नियमित आस्थापनावर घेण्यात यावे.अन्यथा दिनांक २० मे पासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष मुकेश दुर्गपाल,उपाध्यक्ष रॉबिन येमूर्लेवार,सचिव स्वप्नील रामटेके,पुरुषोत्तम मातेरे,निखिल रामटेके,जिवन झोटिंग,प्रदीप पेटकर,वासुदेव मडावी,जयसिंग गायकांबळे,मनोहर किन्नाके,झामदेव सोनवाणे,संदीप आत्राम,संदीप येलकेवार, प्रसनमित करमनकर,गौरव कुणावार यांनी दिलेला आहे.



