उपक्षम रामटेके
मुख्य कार्यकारी संपादक…
तथागत भगवान गौतम बुद्धांच्या जयंतीचा कार्यक्रम मौजा वरवट येथे मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.
याच उत्सवपुर्वक कार्यक्रमात,” त्रिगुणी बुद्ध पौर्णिमेला अनुसरून तथागत गौतम बुद्ध यांच्या २५८७ व्या जयंती निमित्त,”संथागार बहुउद्देशीय बौद्ध मंडळ मौजा वरवट तर्फे ,”ग्रामभुषण पुरस्कार, देऊन सामाजिक कार्यकर्ते तथा तलाठी विनोद कवडुजी खोब्रागडे यांना सन्मानित करण्यात आले.याचबरोबर पत्नी अन्नुताई विनोद खोब्रागडे यांचा सुध्दा आदरपूर्वक सन्मान मौज वरवट वाशियांतर्फे करण्यात आले.
सदर कार्यक्रमात मौजा वरवट गावातीलच नाही तर परीसरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक विचार मंचावर उपस्थित होते.
विनोदकुमार कवडुजी खोब्रागडे यांची कर्मभूमी वरोरा असली तरी जन्मभूमी वरवट आहे…
विनोदकुमार कवडुजी खोब्रागडे यांच्या कार्याची दखल संपूर्ण महाराष्ट्रासह भारतातील जनतेने घेतली असून,जे जनहिताचे काम आमदार,खासदार,मंत्री,लोकप्रतिनिधी,IAS,IPS,अधिकारी करु शकले नाही असे काम विनोदकुमार कवडुजी खोब्रागडे यांनी,नौकरीवर राहुन केले.एक कर्तव्यदक्ष नागरिक म्हणून,भारतीय संविधानाच्या माध्यमातून न्यायालयाद्वारे करुन दाखविले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने अनेकवेळा प्रशस्तीपत्र देऊन त्यांना सन्मानित केले आहे,तर विदर्भ भुषण,वरोरा भुषण,समाज भुषण,शौर्य पुरस्कार,पत्रकार संघाकडून अनेक पुरस्कार,समाजातर्फे अनेक पुरस्कार देऊन अनेक कार्यक्रमात सन्मानित केले आहे.
बुद्ध पौर्णिमा निमित्त संथागार बहुउद्देशीय बौद्ध मंडळ वरवट तर्फे ग्राम भुषण पुरस्कार देऊन सन्मानित त्यांना नुकतेच करन्यात आहे.
कार्यक्रमाच्या प्रसंगी मार्गदर्शन करताना विनोदकुमार कवडुजी खोब्रागडे यांनी नागरीकांचे अधिकार व कर्तव्ये काय आहेत,भारतीय संविधानाची अंमलबजावणी ७५ वर्षांपासून का झाली नाही,याबद्दल महत्वाचे अनुच्छेद सह मार्गदर्शन केले,तसेच CRPC,IPC,नवीन कायदा भारतीय नागरिक सुरक्षा संहिता अधिनियम २०२३,व भारतीय न्याय संहिता अधिनियम 2023,भारतीय साक्षपुरावा अधिनियम 2023,भुसंपादन कायदा 2014,जमीन महसूल संहिता 1966,माहितीचा अधिकार अधिनियम 2005 बदल मार्गदर्शन केले.
लोक बोलत नाही म्हणून त्यांचावर अन्याय अत्याचार होतात,असे अनेक उदाहरणे देऊन नुकतेच दिनांक ०९/०५/२०२५ रोजी जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचा सह १६ आरोपी विरुद्ध FIR दाखल करण्याचे आदेश चंद्रपूर न्यायालयाने दिले त्याबद्दल माहिती दिली.
भारतातील ८०० जिल्ह्यातील प्रत्येक जिल्ह्यात विनोदकुमार कवडुजी खोब्रागडे प्रमाणे मानुस तयार करावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.
कार्यक्रमाला दिगंबर दुर्योधन माझी सदस्य पंचायत समिती चंद्रपूर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्र संचालन शैलेश रामटेके यांनी केले…


