Home देशविदेश वैचारिक तुलनात्मक लेखमाला केवळ भारतीय जनतेसाठीच……  — भाग = 008…

वैचारिक तुलनात्मक लेखमाला केवळ भारतीय जनतेसाठीच……  — भाग = 008…

       “लेखमालेच्या आतापर्यंतच्या भागातून आपण एक भूमिका स्पष्टपणे समजून घेतली की, संविधान विरोधी शक्तीचा जन्म का? आणि तीचे ध्येय कोणते? याची भूमिका स्पष्ट केली. त्याचबरोबर संविधानवादी विचासरणीचा जन्म नैसर्गिक तत्वज्ञानातूनच कसा निर्माण झाला? आणि तीचे अंतिम ध्येय कोणते? ही भूमिका स्पष्ट केली. तरीसुद्धा पुन्हा एकदा सारांशरूपाने सांगावयाचे झाल्यास असे स्पष्ट करता येईल की, “संविधानवादी शक्तीचे ध्येय अगदी जगाच्या शेवटच्या नागरिकापर्यंत स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता ही लोकशाहीची मूलभूत मुलतत्वे पोहचवणे आणि संपूर्ण सजीवसृष्टीचे कल्याण निर्जीवसृष्टीच्या साहाय्याने साधणे हेच अंतिम ध्येय या संविधानवादी शक्तीचे आहे….. 

       याउलट संविधानविरोधी शक्तीचे अंतिम ध्येय हे केवळ” मी “या सर्वनामाच्या अहंकारातून संपूर्ण सजीवसृष्टीला माझे गुलाम बनविण्यासाठीच या शक्तीचा उगम झाला आहे…….!

        आणि या दोन शक्तिमधला संघर्ष म्हणजे क्रांती आणि प्रतीक्रांतीचा इतिहास होय.

        परंतु ,आजपर्यंत गेल्या सुमारे पाच हजार वर्षाच्या भारताच्या आणि जगाच्या इतिहासात या संविधानविरोधी शक्तीला संपूर्णपणे यश कधीच येऊ शकले नाही……..!

       याउलट मात्र पाच लाख वर्षाच्या इतिहासात संविधानवादी शक्तीच्या तत्वज्ञानाला 100% अविष्कारीत झाल्याचा इतिहास आपण सिंधू आणि ग्रीक संस्कृतीच्या उदाहरणातून समजून घेतलेला आहे…..

     म्हणजे पाच लक्ष वर्षे कुठे, आणि पाच हजार वर्षे कुठे….?

      आणि या पाच हजार वर्षातील आत्ताची पाचशे वर्षेच जागतिक पटलावर ही संविधानविरोधी शक्तीची जास्त प्रभावी वाटतात.

       त्याचे एकमेव कारण म्हणजे या वैज्ञानिक क्रांतीने जी क्रांती केली, तीने मार्क्सवादाला जन्माला घातले…….!

       आणि माणसाच्या सदसदविवेक बुद्धीला कायमचे मारून टाकण्याचा प्रयत्न केल्या गेला. लोकशाही मुलतत्वे आणि मानवता धर्माची मुलतत्वे तर सदसदविवेक शक्तीच्या अविष्कारितेवरच अवलंबून असतात. ती शक्तीच नष्ट करण्यासाठी मार्क्सवादाप्रमाणे अनेक विचारसरणीचा जन्म या काळात झाला.

        “ज्याप्रमाणे इतर प्राणी ( मानवाच्या व्यतिरिक्त ) भूक किंवा तहान लागली की शिकार करून भोजन करून पाणि पिऊन झाडाखाली किंवा गुहेत जाऊन झोपतात किंवा आराम करतात. नंतर भूक किंवा तहान लागली की पुन्हा शिकार आणि पाणि, हे चक्र इतर प्राणीमात्राला निसर्गनियमानुसार लागू पडते.

        परंतु , मानवाला विचार करण्यासाठी निसर्गाने मेंदूच्या साहाय्याने बुद्धीचा विकास करण्याची संधी प्रदान केवळ मानवालाच दिलेली आहे…………

      “धर्म ही अफूची गोळी आहे”हे जरी सत्य भासत असले, तरी…….

मानवताधर्माच्या अविष्कारितेचे काय…..?

     हा प्रश्न शेवटी उरतोच ना….!

      आज खा, प्या, मजा करा. हा विचार जरी आर्थिक समानता प्रस्थापित करण्यासाठी जगाच्या शेवटच्या नागरिकाचा विचार करण्यात साम्यवादी तत्वज्ञान निर्माण झाले असले, तरी या शारीरिक सर्व प्रकारच्या भूक भागवीण्याच्या व्यतिरिक्त आणि मानवाच्या व्यतिरिक्त इतर प्राणीमात्राच्या कल्याणाचा विचार मात्र साम्यवादी तत्वज्ञानात दिसत नाही. आहे रे आणि नाही रे या दोन मानवी वर्गामधील दरी नष्ट करण्याची विचारसरणी मात्र साम्यवादात आहे…!

      त्यामुळेच काठमांडू येथील भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर “बुद्ध आणि मार्क्स” या विषयावर बोलताना वरील प्रमुख मुद्दे अधोरेखित केले.

        म्हणूनच की काय ज्या रशियात एकट्या लेनिनने रशियन राज्यक्रांती कार्ल मार्क्स यांच्या साम्यवादी तत्वज्ञानावर घडवून आणली. त्या क्रांतीने मात्र काही वर्षातच रशियाचे विघटन रोखू शकली नाही.

        शेवटी सांगायचे एवढेच की, निसर्गनियमावर आधारित असलेली 100% लोकशाहीच जगाला सर्व विनाशापासून वाचवू शकते. त्यासाठी मानवाने आपल्या सदसदविवेक बुद्धीने आचरण केले पाहिजे. त्यासाठीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताच्या संविधानाची निर्मिती आपल्यासाठी केली आहे….

           यापुढील आठवा भाग उद्या… 

        जागृतीचा कृतिशील लेखक 

       अनंत केरबाजी भवरे

संविधान विश्लेषक, रेणापूरकर, औरंगाबाद, 7875452689