Home Maharashtra शिक्षक आमदार किरण सरनाईक यांची शिक्षणाधिकारी कार्यालय जि.प.अमरावती येथे आढावा बैठक…

शिक्षक आमदार किरण सरनाईक यांची शिक्षणाधिकारी कार्यालय जि.प.अमरावती येथे आढावा बैठक…

युवराज डोंगरे/खल्लार

        उपसंपादक

         किरण सरनाईक शिक्षक आमदार यांचे प्रमुख उपस्थितीत शिक्षणाधिकारी माध्यमिक कार्यालय जिल्हा परिषद अमरावती येथे नुकतीच शिक्षक संघटनांच्या आढावा सभेचे आयोजित करण्यात आले होते.

        अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने शिक्षकांचे अनेक प्रश्न संघटनेचे सरचिटणीस सुभाष सहारे यांनी आढावा सभेमध्ये मांडले. निवडश्रेणीचा प्रश्न आणि इतर सर्व प्रश्न लवकरात लवकर सोडवू असे आश्वासन प्रशासनाचे वतीने देण्यात आले.  

       अमरावती जिल्ह्यामधून मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा २ मध्ये दापोरी शाळेने जिल्हास्तरावर तृतीय क्रमांक मिळवल्याबद्दल मुख्याध्यापक तथा अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष गजानन चौधरी यांचा सत्कार शिक्षक आमदार किरण सरनाईक यांनी केला.

        या आढावा सभेकरिता किरण सरनाईक, शिक्षणाधिकारी प्राथमिक अरविंद मोहरे, तसेच शिक्षणाधिकारी माध्यमिक प्रियाताई देशमुख, कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी आणि बहुसंख्य प्राथमिक व माध्यमिक शिक्षक उपस्थित होते असे प्रसिद्धी प्रमुख अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ सूरज मंडे यांनी कळविले आहे.