Home Maharashtra पिंपरी बुद्रुक येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा 134 वा जयंती उत्सव साजरा...

पिंपरी बुद्रुक येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा 134 वा जयंती उत्सव साजरा करण्यात आला.

  बाळासाहेब सुतार

निरा नरसिंहपुर प्रतिनिधी 

        पिंपरी बुदुक तालुका इंदापूर येथे सालाबाद प्रमाणे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

        या कार्यक्रमा प्रसंगी प्रथम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिमेचे पूजन पिंपरी बुद्रुक गावच्या ग्रामस्थांच्या हास्ते करण्यात आले.

         तथागत गौतम बुद्ध, थोर महापुरुष राजे छत्रपती शिवाजी महाराज,राजर्षी शाहु महाराज, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले,अण्णाभाऊ साठे, राजे उमाजी नाईक, अहिल्याबाई होळकर, छत्रपती संभाजी महाराज, रमाई माता, अशा थोर महापुरुषांच्याही प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

           त्यानंतर प्रमुख पाहुणे व ग्रामस्थ यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी आपले विचार व्यक्त केले. सायंकाळी सात ते नऊ या वेळेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य प्रथमेची मिरवणूक गावातील मुख्य रस्त्याने लहान मुले व मुली तरुण कार्यकर्ते लेझीमाच्या आवाजात वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.

        या कार्यक्रमासाठी गावातील प्रमुख कार्यकर्ते सरपंच, उपसरपंच, आजी-माजी सरपंच,उपसरपंच तरुण कार्यकर्ते, गावचे पोलीस पाटील, आणि सर्व पिंपरी बुद्रुक पंचक्रोशी येथील समस्त ग्रामस्थ व बहुजन समाज मोठ्या संख्येने उपस्थितीत राहून भव्य आणि दिव्य जयंती उत्सवाचा कार्यक्रम उत्साहात पार पाडण्यात झाला.

         शेवटी महाभोजन देऊन कार्यक्रमाची सांगता झाली,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सामाजिक कार्यकर्ते दिलीप ठोकळे यांनी मानले.