Home Maharashtra तलाठी प्रवीण ठोंबरे यांना मिळाला,विभाग स्तरीय आदर्श तलाठी पुरस्कार..  — श्री...

तलाठी प्रवीण ठोंबरे यांना मिळाला,विभाग स्तरीय आदर्श तलाठी पुरस्कार..  — श्री संताजी जगनाडे महाराज तेली समाज कल्याणकारी मंडळाचे भास्कर बावणकर यांनी पुष्पगुच्छ देत केले त्यांचे अभिनंदन!…

शुभम गजभिये 

  विशेष प्रतिनिधी 

       चिमूर तालुका तलाठी संघटनेचे अध्यक्ष,तलाठी प्रवीण ठोंबरे यांना नुकताच विभागीय स्तरीय आदर्श तलाठी पुरस्कार घोषित झाल्याची माहिती मिळताच श्री.संताजी जगनाडे महाराज कल्याणकारी मंडळाचे उपाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते भाष्कर बावणकर यांनी इतर सहकाऱ्यांसोबत तलाठी प्रविण ठोंबरे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील जनहित कार्याच्या शुभेच्छा दिल्यात.

         प्रवीण ठोंबरे हे वडाळा (पैकू) साझा मध्ये तलाठी पदावर कार्यरत आहेत.याचबरोबर ते तलाठी संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी कार्यरत आहेत.

     तलाठी प्रविण ठोंबरे हे शेतकरी व नागरिकांचे प्रश्न,समस्या योग्य प्रकारे हाताळत आहेत.त्यांना विभागीय स्तरीय तलाठी आदर्श पुरस्कार मिळाल्यामुळे तेली समाजाचे नाव उंचावेल अशी प्रतिक्रिया भास्कर बावणकर यांनी अभिनंदन करीत असताना व्यक्त केली.

     यावेळी नायब तहसीलदार डी.के.निकुरे,बालू पिसे,प्रविण सातपुते,शरद हजारे,वंजारी,रोकडे आदी उपस्थित होते.