उपक्षम रामटेके
मुख्य कार्यकारी संपादक…
शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी आज विद्यार्थ्यांना उन्हाळ्यातील सुट्टया देणेबाबत महत्वाचे परिपत्रक काढले.
या परिपत्रकानुसार महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषद,माध्यमिक,उच्चमाध्यमिक शाळांना २ में २०२५ पासून सुट्टया जाहीर करण्यात आल्या आहेत.
सुट्याबाबत आज महत्त्वाचे परिपत्रक,क्रःशिसंमा-25/(ओ-01)/उन्हाळी सुट्टी/एस-1/2237,दि. 29 APR 2025… काढण्यात आले व हे परिपत्रक,१) विभागीय शिक्षण उपसंचालक,सर्व विभाग,2 )शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक), जिल्हा परिषद,सर्व,3) शिक्षण निरीक्षक (उत्तर/पश्चिम/दक्षिण), बृहन्मुंबई.यांना पाठविण्यात आले.
राज्यातील प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची सन 2025 ची उन्हाळी सुटटी व शैक्षणिक वर्ष 2025-26 सुरु करणेबाबत संबंधितांना कळविण्यात आले.
संदर्भ : शासन परिपत्रक क्रःसंकिर्ण-2023/प्र.क्र.105/एस.डी.4, दि. 20/04/2023.
उपरोक्त संदर्भीय परिपत्रकान्वये शासनाने,संपूर्ण राज्यातील राज्य मंडळाच्या प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या उन्हाळी सुट्टीच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी सूचना निर्गमित केलेल्या आहेत.
या अनुषंगाने राज्यातील राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची सन 2025 ची उन्हाळी सुटटी व शैक्षणिक वर्ष 2025-26 सुरु करणेबाबत खालीलप्रमाणे सूचना निर्गमित करण्यात येत आहेत.
1) राज्यातील राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना शुक्रवार,दि.02 में, 2025 पासून सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.2) राज्यातील इतर मंडळाच्या शाळा वेळापत्रकानुसार सुरु असल्यास अथवा अशा शाळांमध्ये महत्त्वाचे शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत असल्यास,विद्यार्थ्यांना सूटी जाहीर करण्याबाबत शाळा प्रशासनाने त्यांच्या स्तरावर उचित निर्णय घ्यावा.
3) पुढील शैक्षणिक वर्ष सन 2025-26 मध्ये विदर्भ वगळता इतर सर्व विभागातील राज्य मंडळाच्या शाळा सोमवार दि.16 जून, 2025 रोजी सुरु करण्यात याव्यात.
4) जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता उन्हाळ्याच्या सुट्टी नंतर तेथील राज्य मंडळाच्या शाळा सोमवार, दि.23 जून, 2025 ते 28 जुन 2025 पर्यंत सकाळ सत्रात 7.00 ते 11.45 यावेळेत सुरु करण्यात याव्यात. सोमवार दि.30.06.2025 पासून नियमित वेळेत सुरु करण्यात याव्यात.
वरील सूचना आपल्या अधिनस्थ सर्व मान्यता प्राप्त राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या निदर्शनास आणून द्याव्यात असे डॉ. श्रीराम शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) शिक्षण संचालनालय म.रा., पुणे,शरद गोसावी शिक्षण संचालक (प्राथमिक शिक्षण संचालनालय) म.रा.पुणे यांनी परिपत्रकाद्वारे कळविले आहे.
सदर परिपत्रकाची माहिती, प्रधान सचिव,शालेय शिक्षण व क्रीडा विभाग,मंत्रालय,मुंबई,आयुक्त,शिक्षण,महाराष्ट्र राज्य,पुणे यांचे कार्यालय,मध्यवर्ती इमारत, पुणे-01, कक्ष अधिकारी (एसडी-4), शालेय शिक्षण व क्रीडा विभाग,मंत्रालय, मुंबई-32. यांना देण्यात आली.



