बाळासाहेब सुतार
निरा नरसिंहपुर प्रतिनिधी
बावडा ते नरसिंहपूर परिसरातील भीमा नदी पात्रा शेजारील शेतकरी समाधानी झाला तर नीरा नदी पात्र कोरडे पडल्याने शेतीसाठी व पिण्यासाठी पाणी नाही म्हणून शेतकऱ्यांची चिंता वाढली.
उजनी धरणातून भीमा नदीत काही दिवसा पूर्वी नुकतेच पाणी सोडल्याने भीमा नद्यांवरील बंधारे पाण्याने तुटुंब भरले आहेत. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील ,नरसिंहपूर, टणु ,पिंपरी बुद्रुक,गणेशवाडी,बावडा,, तर माढा तालुक्यातील,, गारअकोले, टाकळी,चांदज,आलेगाव, शेवरे, या परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकाला जीवदान आल्यामुळे शेतकरी राजा समाधानी झाला आहे.
दुसरीकडे नीरा नदीचे पात्र कोरडे पडल्याने इंदापूर तालुक्यातील,गिरवी, ओझरे, गोंदी, लुुमेवाडी, सराटी, चाकाटी, तर माळशिरस तालुक्यातील संगम, तांबवे, गणेशगाव, सवतगाव,बिजवडी, माळीनगर, अकलूज,या निरा नदी काठावरील गावातील शेतकऱ्यांची पिके ऐन उन्हाळ्यात पाणी नसल्याने पिके जळू लागली आहे.
निरा नदीचे पात्र कोरडे पडलेले आहे. पाण्याविना शेतातील पिके जळू लागलेली आहेत तर वन्य प्राणी आणि जनावरे यांनाही पिण्यासाठी पाणी नसल्यामुळे शेतकरी राजा मेटाकुठे आलेला आहे. पशुपक्षी आणि पाळीव जनावरे यांना जीवन जगणे मुश्किल झालेले आहे.
भीमा नदी काठावरील गावांना जनावरांचा चारा व पिण्याच्या पाण्याची सध्या चिंता मिटल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.
एकीकडे नीरा नदी कोरडी असल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठी चिंता निर्माण झालेली आहे. शेतातील पिके कशी जिवंत ठेवायची उसा सहित सर्व पिके डाळिंब, केळी,चक्कू,आंबा,ऊस,पपई,तसेच फळभाज्या, पाण्याविना जळू लागलेली आहेत. जनावरे व वन्य पशु प्राण्यांना पाणी पिण्यासाठी नीरा नदी पात्रात कसलाच साठा नाही. नदीचे पात्र संपूर्ण कोरडे पडलेले आहे.जीवन जगायचे कसे असा शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे.
उन्हाच्या तीव्रतेने पिके जळू लागलेली आहेत…
राज्यकर्त्यांनी नीरा नदी पात्राकडे लक्ष देऊन पिण्यासाठी पाण्याचे एक तरी आवर्तन सोडावे अशी मागणी निरा नदी कडेच्या संपूर्ण गावकऱ्यांची व तरुण कार्यकर्त्याची मागणी आहे.
चौकट
लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये उन्हाळ्यात नीरा नदी पात्रात पिण्यासाठी पाणी सोडण्यास शेकडो शेतकऱ्यांच्या मागण्या होत्या.
मागणी केलेल्या पाण्याच काय शेतकऱ्यांमध्ये गावागावात पारावर झाडाखाली बसून चर्चा चालू आहेत.
शेतकरी दुहेरी अडचणीत…
एकीकडे नीरा नदी कोरडी तर भीमा नदीं तुटुंब भरली असली तरी विजेच्या लपंडावा अभावी पाणीच देता येत नाही. त्यामुळे विद्युत मोटारी बंद राहत असल्याने केबल, स्टार्टर व मोटारी चोरीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शेतकरी दुदेरी अडचणीत सापडला आहे.
निरा नदीवरील प्रत्येक गावचा पाणीपुरवठा बंद असल्याने पिण्यासाठी पाणी नाही.
लवकरच नीरा नदी पात्रात पाणी सोडण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थ व शेतकरी वर्गातून होत आहे.



