शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी..
अमरावती येथील जवाहर गेट – बुधवारा प्रभागाचे नगरसेवक विवेक कलोती यांचे प्रयत्नाने तसेच माजी मंत्री श्री. प्रवीण भाऊ पोटे यांचे शिफारसी वरून स्व. बापूसाहेब कारंजकर सांभागृह ते श्री. विधळे यांचे घरा पर्यंत कॉंक्रिट रस्ता बांधणे करिता महानगर पालिका फंडातून दहा लक्ष रुपये निधी मंजूर केले.
सदर कामाचे भूमिपूजन आज भारतीय जनता पार्टी महिला आघाडी अध्यक्षा सौ.गंगाताई खारकर,माजी शिक्षण सभापती श्री. आशिषभाऊ अतकरे,नीलकंठ मंडळाचे अध्यक्ष श्री.दीपक भाऊ गुल्हाने,नीलकंठ मंडळाचे माजी अध्यक्ष श्री.बाबासाहेब गंगात्रे, विलास काका कारंजकर यांचे हस्ते संपन्न झाले.
सदर भूमिपूजन सोहळ्यास कृष्णा भाऊ पिंपळकर,राजूभाऊ शेरेकर,आशिष भाऊ पांडे,श्रीकांत भाऊ काळे,निलेश भाऊ कारंजकर,सौरभ भाऊ केवले,अमोल भाऊ शिराळकर, निशांत भाऊ जोशी प्रीतम भाऊ भोरे, मंदार भाऊ नानोटी,चेतन भाऊ गंगात्रे,श्रेयस भाऊ शेलूकर,दीपक भाऊ लेंघे,सागर भाऊ ढवळे,नरेंद्र भाऊ बेनी,श्याम भाऊ शिंगारे,अक्षय भाऊ मुदगल, शमयूर भाऊ इंगोले,मंदार भाऊ माकोडे,सतीश भाऊ बद्रे,सचिन भाऊ कोहळे, मयूर भाऊ जलतारे,राजेश भाऊ ढोले, प्रसादभाऊ जड सह परिसरातील नागरिक उपस्थित होते.



