Home Social माऊली भक्तांना केंद्रस्थानी ठेवून विश्वस्त मंडळ काम करणार :- विश्वस्त ॲड.राजेंद्र उमाप…...

माऊली भक्तांना केंद्रस्थानी ठेवून विश्वस्त मंडळ काम करणार :- विश्वस्त ॲड.राजेंद्र उमाप… — आळंदी देवस्थानच्या विश्वस्त मंडळाचा आळंदी ग्रामस्थांच्यावतीने जाहीर नागरी सत्कार…

दिनेश कुऱ्हाडे 

  उपसंपादक 

आळंदी : संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी मधील सर्व विश्वस्त हे माऊलींच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना केंद्र स्थानी ठेवून काम करतील असे आश्वासन मा.प्रमुख विश्वस्त ॲड.राजेंद्र उमाप यांनी दिले. संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीतील विश्वस्त मंडळाचा समस्त आळंदीकर ग्रामस्थांच्या वतीने जाहीर नागरी सत्कार करण्यात आला त्यावेळी विश्वस्त ॲड.राजेंद्र उमाप बोलत होते.

        पूर्वनियोजित दौऱ्यामुळे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ हे या सत्कार सोहळयाला उपस्थित राहू शकले नाही. यावेळी पालखी सोहळाप्रमुख विश्वस्त डॉ.भावार्थ देखणे, विश्वस्त ॲड.राजेंद्र उमाप तसेच नवनिर्वाचित विश्वस्त चैतन्य महाराज लोंढे, पुरुषोत्तम महाराज पाटील व ॲड.रोहीणी पवार यांचा आळंदीकर ग्रामस्थांच्यावतीने जाहीर नागरी सत्कार करण्यात आला.

       आळंदी देवस्थानच्या सहा विश्वस्तपदांपैकी तीन जागा गेल्या दीड वर्षापासून रिक्त होत्या. दिड वर्षापुर्वी ॲड.राजेंद्र उमाप, योगी निरंजननाथ आणि डॉ.भावार्थ देखणे यांची जिल्हा न्यायालयाकडून नियुक्ती झाली होती, परंतु उर्वरित तीन जागा भरण्यासाठी विलंब होत होता. त्यामुळे जिल्हा न्यायालयाकडून उर्वरित तीन जागांपैकी दोन जागांवर आळंदीकरांची विश्वस्त पदी नियुक्ती केली तसेच आतापर्यंत या मंडळावर पुरुषांचीच नियुक्ती होत होती, परंतु ॲड.रोहिणी पवार यांच्या रूपाने प्रथमच महिलेला विश्वस्तपदाची जबाबदारी मिळाली आहे.

       यावेळी मुख्याधिकारी माधव खांडेकर, पालखीसोहळा मालक बाळासाहेब पवार, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, बबनराव कुऱ्हाडे, रोहिदास तापकीर, राहुल चिताळकर पाटिल, नंदकुमार कुऱ्हाडे, विलास घुंडरे, डि.डि.भोसले, प्रशांत कुऱ्हाडे, सचिन गिलबिले, रमेश गोगावले, राम गावडे, संजय घुंडरे, सागर भोसले, किरण येळवंडे, अजय तापकीर, तुषार घुंडरे, साहेबराव कुऱ्हाडे, पांडुरंग वहीले, विष्णू तापकीर, भालचंद्र नलावडे, नंदकुमार वडगावकर, शंकरराव कुऱ्हाडे, अशोक कांबळे, विलास कुऱ्हाडे, संदीप नाईकरे, पांडुरंग वरखडे, अजित वडगावकर, अनिल वाघमारे, महेश गोरे, श्रीधर कुऱ्हाडे, सुनिल रानवडे, महेश कुऱ्हाडे, ॲड.नाझीम शेख, संकेत वाघमारे, सौरभ गव्हाणे, अरुण घुंडरे, योगीराज कुऱ्हाडे, योगेश आरु, सतीष कुऱ्हाडे, रविंद्र रणदिवे, रोहन कुऱ्हाडे, कोमलताई शिंदे, रुक्मिणीताई गोरे आदी मान्यवर उपस्थित होते.