शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
चिमूर :- ग्राम पंचायत निवडणुकीसाठी सरपंच पदाचे आरक्षणामध्ये ओबीसींना स्थान देण्याबाबत दिनांक २५/०४२०२५ रोजी चिमूर तहसील कार्यालय येथे चिमूर तालुका ओबीसी महासंघाच्या वतीने उपविभागीय अधिकारी चिमूर मार्फत जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर यांना निवेदन देण्यात आले.
दिनांक 23/04/2025 रोजी ग्राम पंचायत निवडणुकीकरीता ग्राम पंचायत सरपंच पदाचे आरक्षणाची सोडत काढण्यात आली.
या सोडतीमध्ये ओ.बी.सी.प्रवर्गातील आरक्षण काढण्यात आले नाही.ही ओ.बी.सी.समाजावर अन्याय करणारी बाब आहे.
ओ.बी.सी.समाज संख्येने अधिक असतांना एकही पद ओ.बी.सी. साही आरक्षीत ठेवण्यात आले नाही ही अत्यंत अन्यायकारक बाब आहे.
दिनांक 23/04/2025 रोजी काढण्यात आलेले सरपंच पदाची सोडत रद्द करावी व नव्याने ओ.बी.सी.प्रवर्गाला सरपंच पदाच्या आरक्षणात स्थान देण्यात यावे अशी मागणी यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने करण्यात आली असून यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघ,कर्मचारी महासंघ,युवा महासंघ,महिला महासंघ,विद्यार्थी महासंघ,किसान महासंघ,चिमूर तालुका सर्व पदाधिकारी उपस्थित होते.



