सुधाकर दुधे
सावली तालुका प्रतिनिधी
सावली कृषी उत्पन्न बाजार समितीची पंचवार्षिक निवडणूक पार पडली. त्यामध्ये काँग्रेस पक्ष प्रणित शेतकरी परिवर्तन आघाडीने काँग्रेस विधिमंडळ गटनेते,आमदार श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवली होती,त्यात १७ पैकी १४ जागांवर विजय संपादन केले होते.
तर भाजपच्या शेतकरी जनता परिवर्तन आघाडीला एका जागेवर समाधान मानावे लागले होते. व २ अपक्ष उमेदवार देखील निवडुन आले होते. मात्र आता या २ अपक्ष नवनिर्वाचित संचालकांनी काँग्रेस प्रणित पॅनेलला पाठींबा जाहीर केला असुन काँग्रेस प्रणित पॅनेलचे संख्याबळ १६ झाले होते,करिता दिनांक २५ एप्रिल २०२५ ला सावली बाजार समितीच्या सभापतीपदी राजू ठाकरे तर उपसभापतीपदी प्रमोद दाजगाये यांची एकमताने निवड करण्यात आली.
महाराष्ट्र विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते, काँग्रेस विधीमंडळ गटनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी सभापतीपदी राजू ठाकरे तसेच उपसभापतीपदी प्रमोद दाजगाये यांचे अभिनंदन करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यामध्ये सेवा सहकारी संस्था क्षेत्रातील सर्वसाधारण गटातून शेतकरी परिवर्तन आघाडीचे अनिल स्वामी, नितीन गोहने, नामदेव ननावरे, राकेश गडमवार, हिवराज शेरकी, राजू ठाकरे, नरेश सुरमवार, इतर मागास प्रवर्ग गटातील निखिल नरेश सुरमवार, विमुक्त जाती भटक्या जमाती विभागातील प्रमोद दाजगाये, महिला आरक्षण गटातून कांताबाई बोरकुटे, नंदाताई आभारे निवडून आले.
ग्रामपंचायत सर्वसाधारण गटातून केशव भरडकर, सुनिल बोमनवार, ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती गटातून अरविंद भैसारे विजयी झाले.
व्यापारी गटातून प्रशांत चिटनूरवार तर मापारी हमाल गटातून मारोती सहारे ह्या संचालकांचा समावेश होता करिता नवनियुक्त संचालकातुन सभापती व उपसभापती यांची निवडणूक कृषी उत्पन्न बाजार समिती सावली येथे पार पडली त्यात एकमताने सभापतीपदी राजू ठाकरे तर उपसभापतीपदी प्रमोद दाजगाये यांची निवड करण्यात आली.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव संदिप गडमवार, माजी बांधकाम सभापती दिनेश चिटनूरवार तसेच काँग्रेस तालुका अध्यक्ष नितीन गोहने,महिला तालुका अध्यक्ष सौ.उषा भोयर,शहर अध्यक्ष विजय मुत्यालवार, नगराध्यक्ष सौ.लता लाकडे,उपनगराध्यक्ष संदीप पुण्यपकार,महिला शहर अध्यक्ष भारती चौधरी, युवा तालुका अध्यक्ष किशोर कारडे,युवा शहर अध्यक्ष अमर कोणपतीवार आदींनी नवनियुक्त सभापतीपदी राजू ठाकरे व उपसभापतीपदी प्रमोद दाजगाये यांचे अभिनंदन केले.
निवडणूक अधिकारी एल.आर.वानखेडे यांनी काम पाहिले.



