“या देशातील प्रत्येक नागरीक हा कोणत्या ना कोणत्या धर्माचा पाईक किंवा अनुयायी आहे. तो नास्तिक असेल तर तेही स्वातंत्र्य त्याला आहे.”
भारताच्या संविधानातून अनुच्छेद 25 ते 28 नुसार ते धर्मस्वातंत्र्य प्रत्येक नागरिकाला प्रदान करण्यात आले आहे. हे मूलभूत स्वातंत्र्य आहे. या स्वातंत्र्याच्या अधिकाराचा कुणीही स्वैराचार करू शकत नाही.
या भारताच्या संविधानाचे एक वैशिष्ट्य आहे. ते हे की, संविधानाने प्रत्येक नागरिकाला, प्रत्येक कायदेमंडळ म्हणजे सर्वच प्रकारच्या लोकप्रतिनिधिंना, कार्यकारी मंडळ म्हणजे राज्य व केंद्र सरकारमधील मंत्री, मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री यांना, राष्ट्रपती, राज्यपाल, न्यायाधीश, न्यायमूर्ती, वकिल, शासकीय कर्मचारी, अधिकारी, निमशासकीय कर्मचारी, अधिकारी, पत्रकारिता करीत असलेली माध्यमे (प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक) , शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी, एकंदरीत या देशात राहणारा प्रत्येक जबाबदार घटक आणि नागरिक या सर्वाना स्वतःच्या सदसदविवेक बुद्धीनुसार सर्वतोपारी आचरण करण्याचे अमर्याद स्वातंत्र्य प्रदान केले आहे……
परंतु , या सदसदविवेक बुद्धी ऐवजी जर कुणी थोडीशी जरी कुटनीतीची सरमिसळ करून आचरण केलेच आणि त्यातून जर…..
स्वैराचार व्यक्त होत असेल, तर त्याला निर्बंध घालण्यासाठी भारतीय दंड संहितेची (IPC) आणि गुन्हेगारी संहितेची (CRPC) सुद्धा निर्मिती केली आहे.
त्याचबरोबर विशेष करून प्रत्येक भारतीयांना आपापल्या धर्मस्वातंत्र्यानुसार त्याचे आचरण करण्याचे, आराधना, उपासना करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य प्रदान केले आहे.
परंतु, त्याचबरोबर त्यांनी आपल्या स्वतःच्या धर्म आचरणाबरोबरच………
मानवता धर्माकडे विज्ञानवादी + विवेकवादी = मानवतवादी होण्याचे आवाहन सुद्धा त्यात केले आहे……!
त्यासाठी त्यांनी त्यांच्या धर्माच्या तत्वज्ञानाला विज्ञानाच्या डोळस श्रद्धेने पाहून आचरण करावे. आणि माणूस म्हणून मानवता धर्माच्या दिशेने वाटचाल करावी. अर्थात हा घटनात्मक नितीचा भाग असल्यामुळे तो बंधनकारक जरी नसला तरी तो एक माणूस म्हणून तरी नैतिकतेने बंधनकारकच आहे……
म्हणूनच……..
“लोकांच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणणारी. परंतु, रक्ताचा एकही थेंब न सांडता. अशी शाही म्हणजे लोकशाही.” :- डॉ.बाबासाहेब आंबेडकर..
जेंव्हा कधीकाळी लोकशाही आणि संविधान ICU मधून आपल्याला केविलवाणी साद घालत असेल…….
तर तीला आपल्याच संरक्षणासाठी ICU तुन बाहेर काढावेच लागेल.
म्हणूच की काय….
अशी शाही नेहमी जीवंत आणि तेवत ठेवण्यासाठी आपण आपली सार्वजनिक सदसदविवेक शक्ती विकसित केल्याशिवाय आणि घटनात्मक नीतीचे वैयक्तिक आणि सामूहिक स्वरूपात पालन केल्याशिवाय आमच्या देशात लोकशाही नांदणार नाही. असा इशारा सुद्धा त्यांनी या संविधान आणि लोकशाही प्रदान करताना दिलेला आहे.
आणि हीच लोकशाही आणि संविधान मूल्ये निरंतर जिवंत आणि तेवत ठेवण्यासाठी आपल्या प्रत्येक जबाबदार भारतीय नागरिकांना एक घटनात्मक आणि नैतिक आणि बंधनकारक कर्तव्य सुद्धा आपल्याला सांगितले आहे……
“लोकशाहीत नेहमी जागृतीचा अग्नी नीरनंतर भडकवत ठेवला पाहिजे….
त्यासाठी घटनाकाराने प्रत्येक जबाबदार भारतीय नागरिकाला संदेश दिलेला आहे…….
“मी, गरीब आहे, मी कमजोर आहे, मी अशक्त आहे,मी अडाणी आहे, माझ्या हातून काय होणार आहे?
असं स्वतःला समजून नतधैर्य होऊ नका म्हणजे हतबल आणि निराश होऊ नका. तुम्हाला जे दिसतं, जे घडतं ते शेजाऱ्याला सांगा. पाजाऱ्याला सांगा. मित्रांना सांगा, नातेवाईकांना सांगा. आणि हे सर्व दिसून सुद्धा मौन धारण करत असाल. तर तुमच्या तुमच्याच भावी पिढीचे खुनी आणि गुन्हेगार ठराल….! :- डॉ.बाबासाहेब आंबेडकर…
त्यासाठी शेवटचा एकमेव संदेश आणि आदेश त्यांनी दिला आहे…….
“गुलामांना गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे ते बंड करून उठल्याशिवाय राहणार नाहीत.” :- डॉ.बाबासाहेब आंबेडकर…
म्हणूनच ही लेखमाला तुमच्यातील सदसदविवेक बुद्धी जी मेलेली आहे, जीला या व्यवस्थेने विविध प्रवाह निर्माण करून तुमच्यातील विवेक कायमचे संपविण्याचा जो कट रचला आहे. त्याला पुन्हा पुनरुजीवित करण्यासाठीच ही……
वैचारिक लेखमाला आहे,ती केवळ तुमच्यासाठीच….
जागृतीचा कृतिशील लेखक
अनंत केरबाजी भवरे
संविधान विश्लेषक, रेणापूरकर, औरंगाबाद, 7875452689


