प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुक्यातील मौजा पिंपळगाव वासियांनी दिनांक २१ एप्रिल २०२५ च्या रात्रोला वाळू भरताना दोन हायवासह एक पोकलॅंड घटना स्थळावर पकडले.
या सत्य आणि प्रत्यक्ष घटनेचे व्हिडिओ,फोटोज् अनेकांकडे असतांना तहसीलदार श्रिधर राजमाने हे पोकलॅंड मालकांवर फौजदारी कारवाईसह दंडात्मक कारवाई करण्यास नकार देत असल्याचे वास्तव नुकतेच पुढे आले आहे.
एमकेएस कंपनीचे हायवा असून या कंपनीचे मालक आमदार किर्तीकुमार भांगडीया यांचे वडील माजी आमदार मितेश भांगडिया आणि त्यांचे लहान बंधू श्रिकांत भांगडिया आहेत.
तर पोकलॅंड भिसी येथील असल्याचे बोलले जात आहे.तो पोकलॅंड कुणाचा आहे हे तहसीलदार श्रिधर राजमाने आणि भिसी पोलिस स्टेशनचे प्रभारी ठाणेदार यांना माहीत झाले आहे.
पोकलॅंडवर कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात येवू नये म्हणून राजकीय दबाव चिमूर तहसीलदार श्रिधर राजमाने आणि भिसी पोलिस स्टेशनचे प्रभारी ठाणेदार निशांत फुलेकर यांच्यावर आला असण्याची दाट शक्यता आहे.
म्हणूनच चिमूर तालुका तहसीलदार श्रिधर राजमाने आणि प्रभारी ठाणेदार निशांत फुलेकर पोकलॅंडवर कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यास नकार देत आहेत.
तहसीलदार श्रिधर राजमाने आणि भिसी पोलिस स्टेशनचे प्रभारी ठाणेदार यांच्यावर दबाव आपणारे ते कोण आहेत हे तहसीलदार श्रिधर राजमाने आणि भिसी पोलिस स्टेशनचे प्रभारी ठाणेदार निशांत फुलेकर यांनी पुढे आणले पाहिजे.
आमदार किर्तीकुमार भांगडीया हे आपल्या शेकडो कार्यकर्त्यांना जिकडे-तिकडे मोठ्या प्रमाणात पाठवून दबावतंत्राचा वापर करीत आहेत काय?या संबंधाने चंद्रपूर जिल्हाधिकारी विनय गौडा,चंद्रपूर जिल्हा पोलिस अधीक्षक सुदर्शन मुक्कमा,उपविभागीय अधिकारी किशोर घाडगे,उपविभागीय पोलिस अधिकारी राकेश जाधव यांनी तातडीने लक्ष देणे गरजेचे झाले आहे असे चिमूर तालुक्यातील एकंदरीत चित्र आहे.
तहसीलदार श्रिधर राजमाने आणि भिसी पोलिस स्टेशनचे प्रभारी ठाणेदार निशांत फुलेकर यांच्यावर राजकीय दबावातंर्गत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न कुणी केला असेल तर सर्वांच्या फोन नंबरची कसून चौकशी झाली पाहिजे असेच अवैध वाळू उत्खननाचे मोठे प्रकरण आहे.



