Home Maharashtra गुरुकूंज अड्याळ टेकडी बचाव साठी हजारों अनुयायांनी केले आंदोलन… — चंद्रपूर...

गुरुकूंज अड्याळ टेकडी बचाव साठी हजारों अनुयायांनी केले आंदोलन… — चंद्रपूर पालकमंत्री,ब्रम्हपुरी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर…

शुभम गजभिये 

विशेष प्रतिनिधी…

      राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गुरूकुंज अड्याळ टेकळीच्या बचावासाठी हजारों गुरूदेव अनुयायांनी 21 एप्रिलला आंदोलन केले.

      संस्थापक व प्रथम संचालक कर्मयोगी संत पु. तुकारामदादा गीताचार्य यांच्या भु-वैकुंठ अड्याळ टेकाडीच्या कार्यासाठी महाराष्ट्र शासनाने २७.०४.१९७३ ला सर्वे क्रे. (१९०)१९, (२९०)२३, (२१८) ९८५ आराजी ३९.०७ एकर जमिनीचा ताबा घु-वैकुंठ समिती,अड्याळ टेकडी या नामे कब्जाहक्काने घटनास्थळी प्रत्यक्ष मंजूर करून दिले होते. 

             सदर जमिनीचे जमिन सर्व शासकिय दस्तावेज व ताबा वहिवाट कागदपत्र भु-वैकुंठ समिती,अडचाल टेकडी नामे उपलब्ध आहे.

      पु.तुकारामदादा गीताचार्य यांच्या मार्गदर्शनात टेकडीवरील सर्व समर्पित सेवक व पंचक्रोशीतील शेकडो गावातील हजारो कार्यकत्यांच्या तन,मन,धनातून,श्रमदानातून अड्याळ टेकडीच्या सर्व वास्तू व प्रयोग निर्माण करण्यात आले.

             अड्याळ टेकडीवर ध्यान-प्रार्थना,सत्संग,मौन साधना शिबीर,स्वावलंचन,पंचायत राज,योग निसर्गोपचार,अध्यात्म गुरुकुल,महिलाश्रम इत्यादी प्रयोग भु-वैकुंठ समितीच्या वतीने सुरू आहे. 

       आज पु. तुकारामदादा गीताचार्य यांची तपोभूमी अड्याळ टेकडी ही ब्रह्मपुरी,चंद्रपूर सहित महाराष्ट्राचे एक भूषण गौरवस्थान म्हणून अनुयायांची श्रद्धा जुडलेली आहे.

           असे असतांना अड्याळ टेकडीची संपूर्ण जमिन मालमत्ता बळकावण्याच्या दृष्टीने अखिल भारतीय गुरुदेव सेवामंडळ संस्था,गुरुकुंज मोझरी,जि. अमरावती यांनी २०१० पासून विविध प्रकारचे न्यायालयीन दावे अड्याळ टेकडीच्या विरूद्ध दाखल केले. 

       परंतु त्यांना ब्रम्हपुरी दिवानी न्यायालयात निपानी क्रमांक १, ५, १२ प्रमाणे व चंद्रपूर सत्र न्यायालयाच्या अपील प्रकरणात सर्व आदेश भु-वैकुंठ अड्याळ टेकडीच्या बाजूला म्हणजे अखिल भारतीय मोझरीच्या विरोधात पारित झाले. 

               सर्व आदेशामध्ये अड्याळ टेकडीच्या जमिन मालमत्तेसंबंधाने अखिल भारतीय गुरुकुंज मोझरीचा कोणताही संबंध किंवा मालकी हक्क नसल्याचे दिवानी न्यायालयाने नमूद केले आहे.

      पुढे चालून पु.लक्ष्मणदादा नारखेडे यांच्या मृत्युचा गैरफायदा घेऊन १२.१२.२०२० ला घरचे धनी घराचे वैरी असलेले मधुकर तुंडलवार नामक इसमाने कोणालाही कानोकान खबर न होऊ देता राष्ट्रीय लोकअदालत ब्रह्मपुरी येथे भु-वैकुंद्र अड्याळ टेकडीची सर्व जमिन मालमत्ता अखिल भारतीय गुरुकुंज मोझरी,जि.अमरावती यांना हस्तांतरण करण्याचा एकतर्फी समझौता करून तसा आदेश पारित करून घेतला. 

        मधुकर तुंडूलवार सदर जमिनीचे मालक,अर्जदार किंवा भु-वैकुंठ समितीचे पदाधिकारी,सदस्य नसतांना म्हणजे त्यांचा जमिनीशी कोणताही संबंध नसतांना सुद्धा त्यांनी हा अखिल भारतीय संस्था मोझरी सोबत हा समझोता न्यायालयात घडवून आणला आणि या कटकारस्थानाला अंजाम दिला.

       तेव्हापासून अड्याळ टेकडीची सर्व जमिन,संपत्ती हडपण्याचे षडयंत्र सुरु झाले व झगडे,भांडणाला बिंग फुटले आहे.

   मधुकर तुंडूलवार यांनी अखिल भारतीय संस्था मोझरीला हस्तांतरण केलेल्या लोकन्यायालय समझौता आदेशाच्या विरूद्ध अड्याळ टेकडीचे संचालक सुभोध दादा,अध्यक्ष नवलाजी मुळे व इतर यांनी चंद्रपूरच्या जिल्हा न्यायालयात आवाहन दिले आहे.