Home Maharashtra शिवर ते हिंगणी धामोडी रस्ता डांबरीकरण करण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी… 

शिवर ते हिंगणी धामोडी रस्ता डांबरीकरण करण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी… 

युवराज डोंगरे/खल्लार 

         उपसंपादक 

          दर्यापूर तालुक्यातील शिवर ते हिंगणी मिर्रझापूर व शिवर ते धामोडी या रस्त्याची अवस्था खूपच खराब झालेली आहे. रस्त्याने लोकांना चालणे कठीण झालेले आहे. या रस्त्याने शाळकरी मुले, गर्भवती स्त्रिया, शेतकरी, व नागरिक यांचे जाणे येणे करणे खूप कठीण झाले आहे.

         तसेच दूचाकी, तीन चाकी चार चाकी वाहने चालवितांना कठीण जात असून वाहनांचे अपघात मोठ्या प्रमाणात होत आहेत. हे रस्ते पावसाळ्याच्या अगोदर दुरुस्त करून डांबरीकरण करण्यात याबाबतचे निवेदन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय चौरपगार यांच्या नेतृत्वात उपअभियंता जि प बांधकाम विभाग दर्यापूर यांना आज दि. 22 रोजी देण्यात आले. 

            यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय चौरपगार यांच्यासह सुरेंद्र तायडे तालुका अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी दर्यापूर,मनोज जामनिक, प्रभाकर चोरपगार, देवानंद धांदे, राजूभाऊ कोल्हे, रोशन डोंगरे, अमर डोंगरे, सागर डोंगरे, श्रीकृष्ण डोंगरे, ईश्वरदास डोंगरे, योगेश डोंगरे, अभिषेक खडे,भावेश डोंगरे,सतीश डोंगरे उपस्थित होते.