रामदास ठुसे
नागपूर विभागीय प्रतिनिधी..
दिनांक : २१ एप्रिल २०२५ | ठिकाण : हळदवाही टोला, ता. चामोर्शी, जि. गडचिरोली येथे क्रिकेट स्पर्धांचे उद्घाटन..
चामोर्शी तालुक्यातील एकात्म आणि एकजूट असलेल्या हळदवाही टोला गावाने ग्रामीण क्रीडासंस्कृतीचे एक अनोखे उदाहरण उभे करत भव्य अंडरआर्म टेनिस रबरी बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले.
संघशिल क्रिकेट क्लब यांच्या सौजन्याने आयोजित या स्पर्धेचे उद्घाटन माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोक नेते यांच्या शुभहस्ते अत्यंत उत्साही वातावरणात पार पडले.
उद्घाटनप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज,डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण व पूजन करून, फीत कापून आणि चेंडू टोलवून मा.खा.डॉ.अशोक नेते यांनी स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन केले.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मा.खा. डॉ. अशोकजी नेते म्हणाले,”खेळ हा युवकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग असून,खेळामुळे शरीर तंदुरुस्त होतोय यासोबतच मानसिक ताजेपणाही लाभतो. शारीरिक श्रमामुळे निर्माण होणारा उत्साह सुद्धा व्यक्तीला यशाच्या शिखरावर नेतो.”तसेच,आपल्या खासदारकीच्या कार्यकाळात केलेल्या विविध विकासकामां संबंधित पुढे बोलत”रेल्वे,मेडिकल कॉलेज, कृषी महाविद्यालय,चिचडोह,कोटगल सिंचन प्रकल्प, रस्ते,गोंडवाना विद्यापीठ,नॅशनल हायवे, एकलव्य विद्यालय या माध्यमातून मी सातत्याने जनतेच्या सेवेत राहिलो आहे.
माझा जरी पराभव झाला असला तरी सेवाभावात खंड पडणार नाही,” असे ठाम प्रतिपादन करत यासोबतच लोकसभेतील निवडणुकीत आपल्या गावाने प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष दिलेल्या सहकार्याबद्दल आभार ही मानत आपल्या भावना व्यक्त केल्या.
गावात अभ्यासिकेची गरज लक्षात घेऊन लवकरच त्या मागणीचा विचार केला जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
कार्यक्रमाच्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून सहकार आघाडीचे प्रकोष्ठ जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक आशिषभाऊ पिपरे, भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षा अनिता रॉय, शिक्षक वकील खेडकर,पोलीस पाटील केशव दुर्गे,उपसरपंच छत्रपती दुर्गे,देवाजी कांबळे,जगदीश मेश्राम,महेंद्र हीचामी,रोहीदास नरोटे,चक्रपान चुनारकर,आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी संघशिल क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष वैभव गोवर्धन,शुभम वनकर,प्रज्वल वाळके,प्रतिक उराडे,सिद्धार्थ रायपूरे, करण खोब्रागडे व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी उत्कृष्ट आयोजन केले.
गावातील महिला भगिनींनी पारंपरिक पद्धतीने ओवाळून व औक्षण करून मा.खा.डॉ.अशोक नेते यांचे स्वागत केले.
या उत्सवमय वातावरणात पार पडलेल्या क्रिकेट स्पर्धेने ग्रामीण युवकांमध्ये नवचैतन्य निर्माण केले.असून,हळदवाही टोला गावाने एक प्रेरणादायी सामाजिक संदेश खेळाच्या माध्यमातून युवकांना दिला आहे.



