दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या ६० व्या वाढदिवसाच्या अनुषंगाने श्रीएकनाथ अध्यात्मिक सेवा वर्षांतर्गत शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेना व श्रीमंत माउली प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून संत क्षेत्रातील व महाराष्ट्रातील अध्यात्मिक क्षेत्रातील कर्तृत्वान महिलांच्या सेवा कार्याचा सन्मान शांतीब्रह्म पू.मारुतीमहाराज कुरेकर यांच्या उपस्थितीत विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलमताई गोऱ्हे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
या पुरस्कार सोहळ्यादरम्यान अध्यात्मिक व सेवाभावी महिला संस्था प्रमुखांचा यावेळी सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेशजी कदम यांच्यावतीने हळदीकुंकू समारंभा अंतर्गत वारकरी शिक्षण संस्थांना स्नेहभेट वस्तू देण्यात आली.
यावेळी शिवसेना उपनेत्या प्रवत्या संजनाताई घाडी, उपनेत्या सुलभाताई उबाळे, महिला जिल्हा प्रमुख मनीषाताई परांडे, श्रीमंत माउली प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनीत सबनीस, सचिव कमलेश तांडेल, महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे, रामशेठ गावडे, शिवसेना आध्यत्मिक सेना सहअध्यक्ष प्रभंजन महतोले, सचिव श्रीराम माळी, शिवसेना शहरप्रमुख राहुल चव्हाण, मृणाल भोसले, वारकरी युवा मंचचे निळोबा गोरठाणकर उपस्थित होते.
आळंदी नगरपरिषदचे मुख्याधिकारी माधव खांडेकर, अखिल वारकरी गुरकुल संघांचे बाळासाहेब महाराज शेळके, किशोरमहाराज धुमाळ यांनी उपस्थितांचे आभार मानले.



