शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी..
चिमुर तालुक्यातील एकूण 92 ग्रामपंचायतींचे बाबतीत सन 2025 ते 2030 या कालावधीसाठी सरपंचपदाचे प्रवर्गनिहाय आरक्षण दिनांक २३ एप्रिल २०२५ रोज बुधवार ला तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी श्रिधर राजमाने यांच्या द्वारे निश्चित केले जाणार आहे.
संदर्भ : मा. जिल्हाधिकारी, चंद्रपर यांचे आदेश क्र.सा.शा/कार्या-12/2-4/1/का-4/ग्रापनी/2025/279 दि. 04/04/2025 नुसार…
चिमुर तालुक्यातील एकूण 92 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे सन 2025-2030 या कालावधीसाठी प्रवर्ग निहाय आरक्षणाच्या सोडतीचा कार्यक्रम दिनांक 23/04/2025 रोजी सकाळी 11.00 वाजता आयोजित करण्याच्या सूचना संदर्भीय पत्रान्वये तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी श्रिधर राजमाने यांच्या द्वारे दिलेल्या आहेत.
त्या अनुषंगाने दिनांक 23.04.2025 रोजी दुपारी 02.00 वा.राजीव गांधी सभागृह,तहसिल कार्यालय,चिमुर येथे संरपंच पदाचे आरक्षणाच्या सोडतीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे.
सदर आरक्षण निश्चिती कार्यक्रमाची जाहीर नोटीस ग्राम महसुल अधिकारी तथा ग्रामपंचायत अधिकारी यांनी आपले कार्यालयीन प्रसिद्धीफलकावर प्रसिद्ध करावी तसेच आपले अधिनस्त सर्व गावात दवंडीद्वारे व्यापक प्रसिध्दी देण्यात यावी अशा प्रकारच्या सुचना पत्रकाद्वारे देण्यात आल्या आहेत.
सदर आरक्षण निश्चितो कार्यक्रमबाबत कोणीही अनभिज्ञ राहणार नाही,याची दक्षता घ्यावी.तसेच जाहीर सूचना प्रसिद्ध केल्याबाबत व दवंडी द्वारे प्रसिद्धी दिल्याबाबत आपला कार्यालयीन अहवाल ग्राम विकास अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी यांचे संयुक्त स्वाक्षरीत तहसील कार्यालयास दिनांक 21.04.2025 रोजी न चुकता सादर करावा अशाही सुचना तहसीलदार श्रिधर राजमाने यांच्या द्वारे देण्यात आलेल्या आहेत.
ग्रामपंचायत सरपंच आरक्षण सोडत बाबत जिल्हाधिकारी चंद्रपूर,उपविभागीय अधिकारी यांना माहीत देण्यात आली आहे तर गट विकास अधिकारी, पंचायत समिती चिमूर यांना आवश्यक कार्यवाहीस आपण आपले अधिनस्त सर्व ग्राम पंचायत अधिकारी यांना सदर पत्राची प्रत बजावून निर्देशित केल्यानुसार सर्व कामकाज विहित कालावधीत पूर्ण करणेबाबत संबंधिताना निर्देशित करावे.
तसेच संबंधिताना पत्राची प्रत बाजाविल्याच्या पोचसह आपला अहवाल दिनांक 21.04.2025 रोजी या कार्यालयास न चुकता सादर करावा असे निर्देश तालुका निवडणूक अधिकारी तथा तहसिलदार चिमुर यांनी दिले आहेत.



