Home देशविदेश भारत निर्माता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर अभद्र आणि अपमानास्पद टिपनी करणाऱ्या त्या महिलेला...

भारत निर्माता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर अभद्र आणि अपमानास्पद टिपनी करणाऱ्या त्या महिलेला नागपूर पोलिसांनी केली वर्धात अटक… — अजनी पोलिस स्टेशन नागपूर येथील पोलिसांची सतर्क कारवाई…  — विविध कलमान्वये फौजदारी कारवाई….

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे 

            वृत्त संपादीका 

      दिक्षा वाघमारे ही महिला पुलगाव येथील हरीराम नगर येथे राहते.सदर महिलेंनी सोशल मीडिया प्लॅटफाॅर्मवर(उदाहरणार्थ इन्स्ट्राग्रामवर) ID – me_diks4 या id वरुन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी अपमानास्पद,खालच्या पातळीचे आणि जातीवाचक वक्तव्ये केली असल्याबाबत आ.अनिकेत कुतरमारे चंद्रमणी नगर यांनी अजनी पोलिस स्टेशन नागपूर येथे १८ एप्रिल २०२५ ला तक्रार दाखल केली होती.

       तक्रारदार अनिकेत कुतरमारे यांनी तक्रारीत म्हटले होते की,”सोशल मिडिया वर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध तात्काळ कारवाई करण्यात यावी.

      तद्वतच तक्रारदार यांनी तक्रारीत म्हटले होते की,मी नम्रपणे निदर्शनास आणून देऊ इच्छितो की अलीकडेच एका दीक्षा नावाच्या मुलीने सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर (उदाहरणार्थ Instagram) ID – me_diks4 या Id वरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अपमानास्पद, खालच्या पातळीचे आणि जातीवाचक वक्तव्ये केली आहेत.

    हा प्रकार अतिशय निषेधार्ह असून समाजामध्ये तेढ निर्माण करणारा आहे.डॉ.आंबेडकर हे भारतरत्न आणि संविधानाचे शिल्पकार असून त्यांच्यावरील अवमान ही केवळ व्यक्तिविषयी नव्हे तर राष्ट्रीय मूल्यांविषयी केलेली घोर अवहेलना आहे.

             आपण संबंधित सोशल मीडिया पोस्टची चौकशी करून,संबंधित व्यक्तीवर आयटी कायद्यान्वये आणि अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम अंतर्गत तात्काळ योग्य ती कायदेशीर कारवाई करावी,अशा प्रकारची मागणी अजनी पोलिस स्टेशन ठाणेदार यांच्याकडे अनिकेत कुतरमारे यांनी केली होती.

          दिक्षा वाघमारे यांच्या विरोधात अजनी पोलिस स्टेशन नागपूर येथे तक्रार दाखल होताच सदर ठाण्याचे ठाणेदार यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि सदर महिलेला वर्धा येथून अटक केली.

         सदर महिलेवर अजनी पोलिस स्टेशन नागपूर येथे भारतीय न्याय संहिता भांदवी कलम १९६,२९९,३५३(२) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत…

       याचबरोबर तिच्या बाबतीत अधिकची माहिती अजनी पोलिस स्टेशनचे ठाणेदार घेत आहेत.