1).माणसाचे भौतिक जीवन म्हणजे अन्न-वस्त्र-निवारा-शिक्षण- आरोग्य-पर्यटन-पर्यावरण उत्तम दर्जाचे मिळणे,तसेच त्याच्यातील सुप्त गुणांना संधी मिळणे,त्याच्यातील कला कौशल्य क्षमता यांचा उपयोग करण्यास वाव मिळणे म्हणजेच माणसाचा भौतिक विकास होणे,असे म्हणता येईल.
परंतु मतदार आणि देशाचा नागरिक म्हणून या भौतिक गोष्टी मिळवण्याचा त्यास हक्क असूनही ते मिळत नाहीत.
याचे कारण सरकारचे चुकीचे धोरण आणि चुकीचे नियोजन आणि भ्रष्टाचार.
2).माणसाचे नैतिक जीवन म्हणजे,दया-क्षमा-शांती आणि सत्य-न्याय-निती या गोष्टीच्या आधारे जीवन जगणे होय.
तसेच बुद्धाने सांगितलेले पंचशील म्हणजे चोरी करू नये,खोटे बोलू नये,व्यसन करू नये,व्यभिचार करू नये,हिंसा करू नये.या शिवाय आपल्या पंचेंद्रियाने म्हणजे शरीराने इतरांना दुखः देऊ नये,म्हणजे काय कुणास मारू नये,तोंडाने वाईट बोलू नये,मनाने इतरांचे वाईट चिंतू नये,भ्रष्ट आचरण करू नये,म्हणजेच भ्रष्टाचार करू नये,तर थोडक्यात घरात,गल्लीत,गावात,शहरातील,देशातील वातावरण सुरक्षित,निर्भय,प्रेमळ,शांतीपूर्ण असावे,देशातील प्रत्येकास शांततेच्या,सुरक्षिततेच्या,सुव्यवस्थेच्या,पर्यावरणात जीवन जगता येणे म्हणजेच नैतिक आणि भौतिक जीवन जगणे होय.
मला माझे मानवी हक्क मिळायला हवेत,याचा अर्थ जीवन जगण्याचा हक्क,विचार आणि अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य,याचा उपभोग मी घेईन आणि इतरांना पण मी स्वातंत्र्य देईन,माझे वर्तन घरात म्हणजे कुटुंबात समतेचे असेल,सार्वजनिक ठिकाणी पण माझे वर्तन समतेचे असेल,माझ्या व्यवसायात,नोकरीत,उद्योगात पण मी समतेच्या न्यायानेच माझी कृती असेल,देशवासीया सोबत त्यांची जात धर्म न पाहता साम्यकदृष्टीने त्यांच्याशी माझा व्यवहार असेल,लहान मोठा,स्त्रीपुरूष,गरीब श्रीमंत,सगळ्यांशीच माझे वर्तन भेदभावाचे न ठेवता माझा हक्क मी मिळवून घेईन,थोडक्यात सर्वांशी मी बंधुभावाने वर्तन करीन,मी न्याय मिळवून घेईन,पण इतरांना पण न्याय मिळवण्यासाठी सहकार्य प्रयत्न करीन,मी माझ्यातील विकृती म्हणजेच लोभ मोह अहंकार क्रोध मान द्वेष आणि सुडाची भावना नष्ट करण्याचा प्रयत्न करीन,आणि सगळ्याशी प्रेमाने आदराने वागेन,मात्र मी माझ्या हक्कासाठी झगडण्यात कुठेही कमी पडणार नाही,या विचाराने, प्रतिदन्या पूर्वक वर्तन करणे म्हणजे नैतिक जीवन जगणे होय.
एकंदरीत माणसाचे भौतिक आणि नैतिक जीवन समृद्ध असले पाहिजे,तरच ते सार्थकी आणि अर्थपूर्ण जीवन समजावे.अन्यथा प्राणी पक्षी या कमी बुद्धीच्या जीवसृष्टी पेक्षा आपले मानवी जीवन वेगळे कसे समजावे? त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक असणार ? यापेक्षा ” नको जिणे लाजिरवाणे ” म्हणून मेलेले बरे.


