“इ. स. पूर्व अठराव्या शतकापासून या आर्याच्या टोळ्या ग्रीक आणि सिंधू संस्कृतीच्या काळात भारतात यायला सुरुवात झाली. त्यांनी त्यांच्यासोबत त्यांच्या स्त्रिया किंवा मुले अजिबात आणले नव्हते. ते जेथे जात तेथील स्त्रियांशी प्रजनन करीत असत. त्यांच्या उत्पत्ती झालेल्या संततीला ते स्वीकारित, परंतु त्या स्त्रीला ते कधीच स्वीकारित नसत. उलट त्या जन्मदात्या स्त्रीच्या उदरातून आलेल्या बाळाला आपल्या पवित्र रांगेत बसविण्यासाठी “विधी” करत असत ( यातूनच पुढे मुंज हा प्रकार पुढे आला, कारण ते स्त्रीला अतिशूद्र समजत असत. म्हणून आजही ब्राम्हणात मुंजचा विधी पित्याच्या मांडीवर बसून केला जातो. त्या ठिकाणी त्या जन्मदात्या आईला प्रवेश सुद्धा नसतो…!)
पुढे आपल्या देशात आर्यांचे अतिक्रमण झाल्यानंतर येथील सहाही वंशाच्या समाजात लोकशाही मुलतत्वे, जी मानवतावादी, निसर्गनियमांना अनुसरून जगणारी असल्यामुळे, याउलट आर्यांची कुटनीती अगदी उलट असल्यामुळे येथील समाज अलगद त्यांच्या जाळ्यात अडकला. पण तरीसुद्धा त्यांच्यात संघर्ष झाले. या संघर्षात कुटनीतीचा विजय झाला (ज्याप्रमाणे आज अजित पवार, एकनाथ शिंदे स्वतःच्या निर्मात्याला सोडून तत्वे धुळीस मिळवून मोदी – शहाच्या जाळ्यात हतबल होऊन फसले)
या कूटनीतीच्या आणि लोकशाहीवादी मूल्यांच्या संघर्षातून जो समाज संपला तो कायमचा संपला. आणि जो त्यांच्या कुटनीतीच्या जाळ्यात फसून जिवंत राहिला. तो म्हणजे आजचा बहुजन समाज होय.
पुढे या बहुजन समाजावर कुणी राज्य करायचं. यासाठी बाहेरून आलेल्या अनेक टोळ्यात युद्ध झाले. त्याला इतिहासात “दाशराज युद्ध” असे म्हणतात. या युद्धात भरत नावाच्या बलदंड आर्य टोळीचा विजय होऊन आपल्या देशाला पुढे भारत नाव पडले…..!
याच काळात ग्रीकमध्ये सुद्धा याच आर्यानी अर्थात आपल्या देशात जसे ब्राम्हण्य वृत्ती तसेच तेथील सोफेस्टीकिटेड वृतीचे लोकं. यांनी तेथील लोकशाहीवादी, मानवतवादी मूल्यांच्या ग्रीक संस्कृतीला सिंधू संस्कृती प्रमाणेच नष्ट करण्याचा प्रयत्न केला. आणि आपल्या कुसंस्कृतीचा जम बसविला.
आर्याच्या आक्रमनापासून ते आजपर्यंत या सुमारे चार हजार वर्षाच्या प्राचीन भारताच्या इतिहासात धर्म संस्कृतीचा जन्म झाला. यात आज जो बहुसंख्याकांने ज्याला हिंदू धर्म समजल्या जातो. त्याचे प्राथमिक स्वरूप आणि त्याची उत्पत्ती प्रथम पूर्व वैदिक काळ, ज्यामध्ये वेदांची निर्मिती झाली. त्यानंतर उत्तर वैदिक काळ, त्यानंतर पूर्व ब्राह्मणी काळ, त्यानंतर उत्तर ब्राह्मणी काळ, याच काळात मनुस्मृतीच्या निर्मितीचा सुद्धा काळ समजल्या जातो. पुढे अनेक शतकात हळूहळू लोकशाहीवादी, मानवतावादी मूल्ये आपल्या देशातून नष्ट होऊन साम, दाम, दंड आणि भेदावर आधारित असलेल्या कुटनीतीची भरभराट झाली. निसर्गवाद सुद्धा आपल्या देशातून गायब होऊन त्याची जागा देवाने, परमेश्वर यांनी घेतली. आर्यानी म्हणजेच भारतीय ब्राम्हणांनी याच देवाच्या नावावर ( अग्निदेव, इंद्रदेव इत्यादी देवांच्या कल्पना आर्यानी सोबतच आणल्या होत्या ) पुरोहितशाही निर्माण केली. देव आणि सामान्य जनता यांच्या स्वतःची भिंत उभी करून जनतेची सर्वांगीण पिळवणूक करण्यास सुरुवात केली.
आर्य भारतात आल्यानंतर जवळपास 1500 वर्षातच आपल्या कुसंस्कृतीचा त्यांनी 100%जम बसवून लोकशाही शासन प्रणाली जी. त्यांच्या आगमनापूर्वी 100% अस्तित्वात होती. ती निसर्गनियमवादी, लोकशाही मूल्ये कायमचे या देशातून आणि ग्रीक मधून हद्दपार झाली.
याच सुमारे 1500 वर्षाच्या शेवटच्या काळात येथील भारतीय सर्वसामान्य जनता या कूटनितिच्या, मनुवाद्यांच्या मनुस्मृतीच्या धार्मिक कर्मकांडाला बळी पडून जगता – जगता मरत होती. आणि मरता – मरता जगत होती.
देशात सगळीकडे होम – हवन, यज्ञ, मुक्या प्राण्यांचा बळी, माणसांचा नरबळी, सुद्धा या यज्ञात जात असे. यात केवळ ब्राम्हणवृतीच्या एकाच जातीच्या श्रेष्ठत्वासाठी जणू देशाची निर्मिती झाली असा भास होत होता. म्हणूनच म्हटले जाते की, ब्राम्हणाकडून, ब्राम्हणांनी केवळ ब्राम्हणांसाठीच चालविलेली स्मृती म्हणजेच मनुस्मृती होय. यातील उर्वरित तिन्ही वर्णातील लोकं ( क्षत्रिय, वैश्य, शूद्र ) यांनी त्यांची मनुस्मृतीनुसार, चाकरी करावी.
थोडक्यात सारांश असा की, आजपासून सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वीपर्यंत आपल्या देशातील सर्वसामान्य जनता या मनुस्मृतीच्या धार्मिक मानसिकतेच्या गुलामीत अक्षरंशा भरडली जात होती. स्वातंत्र्य , समता, न्याय आणि बंधुता, निसर्गनियम, लोकशाही मूल्ये हे सर्व तत्वज्ञान जगाच्या वेशीवर टांगल्या गेली होती………….!
या लेखाचा पुढील भाग उद्याच्या भागात…..



