प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
युगप्रवर्तक तथा आधुनिक भारताचा पाया रचणारे राष्ट्रनिर्माता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीचा कार्यक्रम नागपूर जिल्हातंर्गत जलसंपदा आणि जलसंधारण विभागाद्वारे दिनांक २२ एप्रिल २०२५ रोज मंगळवारला आयोजित केला आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयु.राजेश सोनटक्के,कार्यकारी संचालक विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर हे असणार आहेत.
तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रसिद्ध तत्ववेत्ता आयु.रणजित मेश्राम असणार आहेत.
जयंती समारोह प्रसंगी,”डॉ.बाबासाहेब आंबेडकर समज- गैरसमज,या विषयाला अनुसरून मुख्य मार्गदर्शक मार्गदर्शन करणार आहेत.
प्रमुख अतिथी म्हणून आयु.रवीकुमार पराते मुख्य अभियंता प्रभारी,आ.राजेश पाटील मुख्य अभियंता प्रभारी,आ.वसंत बा.गालफाडे मुख्य अभियंता (जलसंधारण),आयु.संजय विश्वकर्मा अधीक्षक अभियंता,आयु.अनिल फरकडे अधीक्षक अभियंता,आयु.अनुराग सावरकर अधीक्षक अभियंता,आयु.रविंद्र वानखेडे अधीक्षक अभियंता,आयु. योजना पुनसे अधीक्षक अभियंता,आयु.रमेश खैरनार अधीक्षक अभियंता,आयु.प्रवीण झोड अधीक्षक अभियंता,आयु.राजेश सोनोने अधीक्षक अभियता,आयु.हनुमंत खटके अधीक्षक अभियंता (जलसंधारण),आयु.महादेव कदम अधीक्षक अभियंता,आयु.अनंत जगताप अधीक्षक अभियंता हे कार्यक्रमाच्या प्रसंगी आवर्जून उपस्थित राहणार आहेत.
सदर कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्ष आयुष्यमती सोनाली चोपडे अधीक्षक अभियंता व प्रशासक,लाभक्षेत्र विकास प्राधिकरण,अजनी, नागपूर या असणार आहेत.
कार्यक्रमाचे स्थळ वैनगंगा परिसर नगर अजनी नागपूर असे आहे.दिनांक २२ एप्रिल २०२५ रोज मंगळवारला दुपारी ३.३० वाजता कार्यक्रमाला सुरुवात केली जाणार आहे.
कार्यक्रमानंतर सर्वांनी सहकुटुंब सहभोजन घेऊन उपकृत करावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
तद्वतच अतिशय महत्त्वपूर्ण विषयाला अनुसरून विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा कार्यक्रम आयोजित केला असल्याने जलसंपदा आणि जलसंधारण विभागाचे सर्व अधीक्षक अभियंते,कार्यकारी अभियंते,व सर्व अभियंता गण,कर्मचारी वृंद,जलसंपदा मैत्री संघ,कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.
तथा युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती कार्यक्रमाला सहपरिवार उपस्थित राहण्याचे विनंती पुर्वक आवाहन त्यांनी केले आहे.



