Home देशविदेश करु झाले काय आणि आता कायद्याने पसरले पाय? — अतिशयोक्तीची बेभान...

करु झाले काय आणि आता कायद्याने पसरले पाय? — अतिशयोक्तीची बेभान संवेदनशीलता चिमूरकरांच्या आली अंगलट…

   उपक्षम रामटेके 

मुख्य कार्यकारी संपादक 

        दिनांक १४ एप्रिलच्या रात्रोला अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराची गंभीर घटना चिमूर शहरात पसरताच शेकडो नागरिकांनी पोलिस स्टेशन गाठले.

        मात्र,पोलिस स्टेशन मध्ये जमलेल्या काही नागरिकांनी घटनेबाबत आक्रोश व्यक्त करताना स्वतःच्या मनावरचा ताबा सोडला व दगडफेक अंतर्गत न होणारी तोडफोड घटना घडली.

         या दगडफेकीत चिमूर पोलिस स्टेशनचे काच फुटले व महिला पोलिस शिपाई यांना मार लागला.

      पण,दगडफेक आणि त्यातंर्गत या अनुचित घटनेची पोलिस विभागाने गंभीर दखल घेतली व आता अनेकांवर गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात सुरुवात झाली.म्हणूनच,”करु झाले काय आणि कायद्याने पसरले पाय म्हणण्याची वेळ चिमूरकरांवर आली आहे.

       वास्तविकता चिमूर पोलिसांनी आरोपींना अटक केल्यानंतर प्रकरण समजदारी नुसार हाताळणे आवश्यक होते.

         अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या अत्याचारी आरोपींना अटक करून चिमूर पोलीसांनी आपले कर्तव्य वेळेत पार पडल्यामुळे न्यायालयीन प्रक्रियांच्या अनुसरून निर्णयाची प्रतीक्षा सर्वांनाच करावी लागतय हे चिमूरकरांनी सहज समजून घेणे आवश्यक होते.

         पोलिस आरोपी बाबत निर्णय देत नाही,या कायदेशीर बाबीला लक्षात घेतले तर योग्य आणि लवकर निर्णयासाठी पत्रव्यवहार हा महाराष्ट्र राज्याच्या महामहीम राज्यपालांना,मुख्यमंत्र्यांना,आणि गृहमंत्र्यांना करावा लागतो याची जाणीव नागरिकांना असणे आवश्यक आहे.

          मात्र, आरोपींना अटक केल्यानंतर आरोपींच्या शिक्षेबाबत पोलिसच सर्वेसर्वा आहेत हे समजून अनुचित घटना घडवून आणणे बरोबर नाही.

     तद्वतच,आरोपी कायद्याच्या कचाट्यातून बाहेर पडू नये म्हणून योग्य चौकशी आणि त्यातंर्गत घटनेच्या चौकशी अहवाल योग्य पाठवण्याची मागणी उचित असते,हे नाकारता येत नाही.

         परंतू,चिमूर पोलिस स्टेशन मधील दगडफेकीचा अनुचित घटनाक्रम अनेकांच्या अंगलट येणार असल्याची चिन्हे आता दिसू लागली आहेत.

    (सदर घटना चिमूर पोलिस स्टेशन अंतर्गत येत असून चिमूर हे तालुक्याचे ठिकाण आहे.चिमूर चंद्रपूर जिल्हातील संवेदनशील शहर आहे.चंद्रपूर जिल्हा महाराष्ट्र राज्यात आहे…‌)