“संपूर्ण जगात केवळ दोनच मानवी संस्कृती अशा होऊन गेल्या की ज्याममध्ये लोकशाही शासन प्रणाली 100% अविष्कारीत झालेली होती.त्या दोन संस्कृती म्हणजे आर्याच्या आगमनापूर्वीच्या एक सिंधू संस्कृती असलेला भारत देश आणि दुसरा ग्रीक संस्कृतीचा ग्रीक देश.”
” या दोन्ही देशात समकालीन सुमारे आजपासून 4000 वर्षापूर्वीपर्यंत लोकशाही 100% रुजल्या गेलेली होती. म्हणूनच ग्रीक आणि भारतात तत्ववेत्त्यांची खाण समजल्या जाते.
ज्याप्रमाणे आपल्या देशात भगवान बुद्ध आणि त्यांच्या धम्माचा जन्म होऊन सुद्धा आर्याच्या प्रतीक्रांती मुळे या देशातून लय होऊन जगात इतरत्र फोफावला!
अगदी त्याचप्रमाणे या दोन्ही देशावरील आर्याच्या कूटनितीच्या आक्रमणामुळे ये दोन्ही देशातून तत्व वेत्त्यांच्या खाणीचे पुढील काळात उच्चाटन झाले आणि इतर पश्चिमात्ये राष्ट्रात ( युरोपयन) ती पसरली.
म्हणूनच इंग्लंड देशात अनेक शतकापासून पुढे लोकशाहीचे वारे वाहत गेले. त्याचाच परिणाम म्हणून पुढे इंग्लंड मधूनच लोकशाहीतील स्वातंत्र्य,समता,न्याय आणि बंधुतेच्या वातावरणातूनच ( 100% जरी नसले तरी जगाच्या तुलनेत सर्वात जास्त होते ).
परंतु ,पुढे चालून इथेही या कुटनीतीने पाय पसरन्यास सुरुवात केल्यामुळे त्यांच्यातील लोकशाही तत्वज्ञानाला आर्थिक प्रगतीच्या साम्राज्यवादातून जगावर राज्य करण्याच्या महत्वाकांक्षेचा जन्म होऊन पुढे याच इंग्लंडने अर्ध्या जगावर राज्य केले!
असो……
तर जेंव्हा या दोन देशात ( ग्रीक आणि भारत ) नैसर्गिक नियमानुसार स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता ही लोकशाही मूल्ये 100% अविष्कारीत झालेली होती.निसर्गाला समजून घेण्याची जिज्ञासा त्या काळातील समाजात जिवंत होती.जरी तत्कालीन माणसाची आजच्या सारखी विकसित मानसिकता नसली तरी निसर्गाला आणि त्याच्या सर्व प्रकारच्या प्रक्रियेला समजून घेत तसे आचरण करण्याचे तत्वज्ञान त्याने स्वीकारले होते.
म्हणूनच लोकशाही मूल्ये त्याठिकाणी अविष्कारीत झालेली होती!
आपल्या देशात त्या काळात नाग,द्रविड ,अज,यक्षु,शिग्रू आणि पणी या सहा वंशाचे लोकं राहत असत.याच सिंधू संस्कृतीचे अवशेष मोहेंजोदाडो आणि हडप्पा या शहरांतील उत्खनणामुळे सापडले.ज्यामध्ये एकही देवाचे देऊळ किंवा मंदिर नव्हते!
सार्वजनिक स्नानगृहे होती. जिथे स्त्री आणि पुरुष एकत्र स्नान करत असत. अर्थात तात्कालीन समाजात लिंगभेद नव्हता!
आजच्या बहुजन समाजातील सुशिक्षित युवापिढीने ध्यानात घ्यायला हवे की आपण ज्या मंदिरात जाऊन आपण मी पास व्हावे,माझे लग्न व्हावे,मी श्रीमंत व्हावे म्हणून देवाला नवस अथवा प्रार्थना करतात.तर हाच देव किंवा त्याचे मंदिर 5000 वर्षांपूर्वी आपल्याच देशात का नव्हते?
ज्यांना आज आपल्या धर्माचा आणि जातीचा गर्व आहे.तो या सिंधू संस्कृती मध्ये कुठेही दिसत नाही….
हे सर्व आपल्या मूळ संस्कृतीत नसतानाही कुठून आले.?
या प्रश्नाचे उत्तर आजचा हिंदू धर्म आणि त्याचे अनुयायी शोधेल काय?
तर अशा सहा वंशाच्या ( ही सहा वंश सुद्धा आपल्याच देशातील वेगवेगळ्या प्रदेशात,वेगवेगळे नैसर्गिक वातावरण असल्यामुळे,आणि वेगवेगळ्या चालीरिती असल्यामुळे ही नावे आली). सिंधू संस्कृतीच्या अशा भारत देशात आणि ग्रीक देशात अशाच पद्धतीची लोकशाही अविष्कारीत झालेली असताना…..
संपूर्ण जग पाच लक्ष वर्षाच्या मर्कट अवस्थेतील इतिहासातील काळापासून ते या 5000 वर्षांपूर्वी पर्यंतच्या काळापर्यंत येथील म्हणजे जगातील माणूस विशेषतः भारतातील सिंधू आणि ग्रीकमधील ग्रीक संस्कृती या दोन्ही संस्कृती निसर्ग नियमांवर त्याच्या आकलन क्षमतेनुसार निसर्गाला ओळखत ओळखतच प्रगती करत होती…
अशाच काळात जगात इतरत्र कुठेतरी एका कुसंस्कृती असलेल्या कूटनितीचा जन्म झाला!
जी कूटनीती निसर्ग नियमांच्या विरुद्ध होती…….
जी मानवतावादाच्या विरुद्ध होती……
जी संपूर्ण सजीव सृष्टीला आपले गुलाम बनविण्याची ध्येय बाळगून होती…..
अशा कृत्रिम अमानवीय वृत्तीच्या कूटनितीचा जन्म झाला. जी कूटनीती साम,दाम,दंड आणि भेदावर आधारलेली होती. या कुटनीतीला जन्माला घातले ते बाहेरून आलेल्या आर्यांनीच ( जो आर्य वंशिय हिटलर होता, ज्याने संपूर्ण जगाला आपले गुलाम बनविण्याचा विडा उचलला होता.त्यासाठीच त्याने दुसरे महायुद्ध जगावर लादले होते,तो याच आर्य वंशाचा होता) म्हणजेच आजच्या ब्राम्हण्य वृत्तीनेच!
अशा या आर्यानीच प्रथम नैसर्गिक नियमांनाच विरोध करून पहिल्यांदाच निसर्गाला शह दिला.तो अशा प्रतीक्रांतीच्या रूपाने.
म्हणजेच या कुटनीतीने बहुजन समाज ज्या देवाला सर्व शक्तिमान समजतो.त्या देवालाही या आर्यानी म्हणजेच आपल्या देशातील ब्राम्हण वृतीने देवालाही आपले (ब्राम्हणांचे ) गुलाम बनवले!
आणि बहुजन समाजाला गुलामाचे गुलाम बणवले….
अशा आर्यानी आपल्या कुट नितीद्वारे जगात कुठे आपला जम बसतो का.हे पाहण्यासाठी त्यांनी जग पायाखाली घातले. मजल दरमजल करत करत एकाच वेळी ते ग्रीक मध्ये आणि सिंधू संस्कृतीत ते आले. बरं ते काही एकदमच आले असे नाही. तर त्यांच्या टोळ्यांचे आगमन / आक्रमण कित्येक वर्षे आपल्या भारतात चालत राहिले.
या लेखाचे लेखक आणि आवाहनकर्ता….
अनंत केरबाजी भवरे..
संविधान विश्लेषक, रेणापूकर,औरंगाबाद, 7875452689…



