“सुमारे साढेचारशे कोटी वर्षांपूर्वी या अंतराळात एका महासूर्याचा महास्फ़ोट झाला. यातुन नऊ गृहाची उत्क्रांतवादाच्या सिद्धांत्तानुसार निर्मिती झाली.
या नऊ गृहांपैकी एक ग्रह म्हणजे ज्या पृथ्वीवर आपण राहतो ती पृथ्वी. याच पृथ्वीतलावर पुढे साढेतीनशे कोटी वर्षात अनेक नैसर्गिक स्थित्यंतरे घडून आली.
यानंतर म्हणजे आजपासून सुमारे 100 कोटी वर्षांपूर्वी पाण्यात अमिबा ( OCTOPUS ) नावाचा एक पेशीय सजिवाची उत्क्रांती झाली. पुढे याच अमिबापासून पुढील 95 लाख वर्षाच्या काळात अनेक सजीव प्राण्यांची उत्क्रांती होत गेली. आणि आजपासून सुमारे पाच लक्ष वर्षांपूर्वी पहिला मानव माकडाच्या ( मर्कट अवस्थेतला ) रूपातला उत्क्रांत झाला.
पुढे याच पाच लक्ष वर्षाच्या मानवी संस्कृतीच्या इतिहासातील दहा हजार वर्षे बाजूला केली तर सुमारे चार लाख नव्वद हजार वर्ष हाच मर्कट अवस्थेतील मानव निसर्ग नियमावर आधारित असलेल्या तत्वाशी एकनिष्ठ राहून जगत आलेला होता.याच कालावधीत महत्वाचे दोन शोध सुद्धा या मर्कट अवस्थेतील उत्क्रांत अवस्थेतील मानवाने लावले!”
“पहिला शोध म्हणजे अग्नीचा आणि दुसरा शोध म्हणजे चाकाचा….
या दोन शोधानंतर येथील मानव शेवटच्या म्हणजे आजपासून दहा वर्षांपूर्वीच्या शेती संस्कृतिकडे वळून शेती करून एकोप्याने एकाजवळ दुसरा अशी अनेक माणसं एकत्र येऊन जंगलात राहू लागली.पुढे साधारणपणे तीन हजार वर्षात याच मानवाने हळूहळू प्रगती करण्यास सुरुवात केली.”
“साधारणपणे या पाच लक्ष वर्षाच्या इतिहासातील शेवटचे पाच हजार वर्षे सोडली तर, सुमारे चार लक्ष पंच्यान्नव हजार वर्षांच्या इतिहासात हाच मर्कट अवस्थेतून आजच्या मानवाच्या अवस्थेत येत असताना हाच मानव 100% निसर्गनियमानुसार जगत आलेला.
या जगात अनेक प्राचीन मानवी संस्कृती आहेत.इजीप्शीयन,ग्रीक,बॅबिलोनियन, रोमन,मेसोपोटेमियन,सुमेरियन, सिंधू ,इत्यादी मानवी संस्कृती या पृथतलावर होत्या.
यामध्ये सर्वात प्राचीन मानवी संस्कृती म्हणून मेसोपोटेमियन संस्कृती समजल्या जाते.या सर्व प्राचीन मानवी संस्कृतीमध्ये ग्रीक आणि सिंधू संस्कृती एक आदर्श संस्कृती म्हणून गणल्या जातात……
या वैचारिक आणि ऐतिहासिक लेखामालेचे लेखक आणि आवाहनकर्ता…
अनंत केरबाजी भवरे
संविधान विश्लेषक,रेणापूरकर, औरंगाबाद, 7875452689 …



