Home देशविदेश डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती नवजीवन मध्ये उत्साहात साजरी… — विविध स्पर्धांचे आयोजन…

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती नवजीवन मध्ये उत्साहात साजरी… — विविध स्पर्धांचे आयोजन…

ऋग्वेद येवले 

  उपसंपादक 

        भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३४वी जयंती नवजीवन कॉन्व्हेंट अँड इंग्लिश प्राइमरी स्कूल (CBSE), जमनापूर/साकोली येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

         कार्यक्रमाची सुरुवात डॉ.आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी शाळेच्या प्राचार्या सौ.भारती व्यास, शाळा व्यवस्थापक विनोद किरपान, प्रशासकीय अधिकारी सतिश गोटेफोडे, पर्यवेक्षिका वंदना घोडीचोर, शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

         या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी डॉ.आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित भाषणे, गीत आणि समूहगान सादर करत बाबासाहेबांना अभिवादन केले. “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” या त्यांच्या प्रेरणादायी घोषवाक्याचे महत्त्व सर्वांना पटवून देण्यात आले.

         प्राचार्या सौ.भारती व्यास यांनी आपल्या मनोगतातून डॉ.आंबेडकरांचे शिक्षणातील योगदान, संविधान निर्मितीतले कार्य आणि सामाजिक समतेसाठी त्यांनी घेतलेले कष्ट यावर प्रकाश टाकला. त्यांच्या विचारांचा आदर्श विद्यार्थ्यांनी जीवनात अंगी कारावा असे आवाहन त्यांनी केले.

          विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, भाषण स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, पोस्टर तयार करणे तसेच घोषणा लेखन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांना नर्सरी ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद लाभला.

         कार्यक्रमाच्या शेवटी ‘जय भीम’ च्या घोषणांनी संपूर्ण वातावरण भारावून गेले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये बाबासाहेबांविषयी आदरभाव, प्रेरणा आणि सामाजिक जाणिवा वाढीस लागल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छाया केवट यांनी केले.