रामदास ठुसे
नागपूर विभागीय प्रतिनिधी
गांधी सेवा शिक्षण समिती चिमूर द्वारा संचालित राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालय चिमूर येथे समान संधी केंद्राच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गांधी सेवा शिक्षण समितीचे अध्यक्ष डॉक्टर दीपक यावले होते त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचे जीवन चरित्र आणि त्यांनी भारतीय राज्यघटनेमध्ये समाजातील प्रत्येक घटकांकरिता दिलेल्या योगदानाबद्दल आपले मत व्यक्त केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे कायदेतज्ञ, अर्थशास्त्री, लेखक, पत्रकार, समाज सुधारक होते असे त्यांनी सांगितले. डॉ. बाबासाहेब यांनी शेतकरी तसेच महिलांच्या हक्कांकरिता विशेष प्रयत्न केले असे मत व्यक्त केले.
त्यांनी आपल्या मनोगतात डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे बहुआयामी व्यक्तिमत्व होते असे सांगितले. डॉक्टर संजय पठाडे यांनी आपल्या प्रमुख मार्गदर्शनामध्ये न्याय आणि सामाजिक न्याय यावर विशेष भर दिला. याप्रसंगी महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ. प्रफुल्ल बनसोड,ज्येष्ठ प्राध्यापक तथा मराठी विभाग प्रमुख डॉ. कार्तिक पाटील यांनीही मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक समान संधी केंद्राचे प्रभारी प्राध्यापक डॉ. हरेश गजभिये यांनी केले. संचालन प्रा. आशुतोष पोपटे तर आभार प्रदर्शन प्रा.राकेश कुमरे यांनी केले. या कार्यक्रमाकरिता महाविद्यालयातील सर्व शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



