शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
चिमूर :- चिमूर तालुकातंर्गत मौजा पळसगांव येथील नालंदा बुध्द विहारात,हवा वेगाने नव्हती.हवे पेक्षाही त्यांचा वेग होता अन्याय विरुद्ध लढण्याचा त्यांचा इरादा नेक होता असा रामजी बांबाचा लेक भिमराव आंबेडकर लाखात नाही तर जगात एक होता.
भारतरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर,प्रियदर्शनी सम्राट अशोक,गौतम बुद्ध,माहात्मा ज्योतीबा फुले,यांच्या प्रतिमेंला मान्यवरांच्या हस्ते हार अर्पण पंचशिल ध्वजाचे ध्वजारोहण अखिल भारतीय बौद्ध महासभा शाखा अध्यक्ष कैलास खोब्रागडे यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाप्रसंगी उध्दव लोखंडे अधिकारी खडसंगी,पुष्पा लोखंडे,कैलास खोब्रागडे अखिल भारतीय बौद्ध महासभा शाखा अध्यक्ष,संजय जुमळे अखिल भारतीय बौद्ध महासभा शाखा सचिव,सरीता गुरुनुले सरपंच ग्रामपंचायत पळसगांव, तुळसिदास शेरकुरे उपसरपंच ग्रामपंचायत पळसगांव,जयवंता रामटेके महामाया महिला मंडळ अध्यक्ष,लता खोब्रागडे महामाया महिला मंडळ सचिव,रागिना दडमल पोलीस पाटिल पळसगांव,उपासक उपासिका आवर्जून उपस्थित होते.



