शुभम गजभिये..
विशेष प्रतिनिधी..
विश्वरत्न,युगप्रवर्तक,भारत निर्माता डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती दिनानिमित्त चंद्रपूर जिल्हातंर्गत तालुका चिमूर येथील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना सर्व पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी चंद्रपूर जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा विरोधी पक्षनेते,ओबीसी सेलचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष,चिमूर विधानसभा मतदारसंघाचे समनवयक डॉ.सतीष वारजूकर,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे चंद्रपूर जिल्हा महासचिव गजानन बूटके,चिमूर शहर अध्यक्ष अविनाश अगडे,माजी नगरसेवक विनोद ढाकुनकर,आदीं पदाधिकारी उपस्थित होते.


