Home Maharashtra आळंदीत नवोदित पैलवानांसाठी जय गणेश कुस्ती केंद्राची उभारणी…

आळंदीत नवोदित पैलवानांसाठी जय गणेश कुस्ती केंद्राची उभारणी…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक

आळंदी : येथील जय गणेश ग्रुपचे अध्यक्ष व माजी उपनगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे यांच्या संकल्पनेतून आळंदीत होतकरु पैलवानांसाठी जय गणेश कुस्ती केंद्राचे उद्घाटन नुकतेच हनुमान जन्मोत्सवाचे औचित्य साधुन करण्यात आले.

          या कुस्ती केंद्राचे उद्घाटन उप महाराष्ट्र केसरी शिवाजीराव रानवडे व बाळासाहेब ढोले तसेच आळंदीतील जुन्या काळातील नामवंत पैलवान मंडळीच्या शुभहस्ते करण्यात आले.

           यावेळी बबनराव कुऱ्हाडे, सुरेश वडगावकर, डि.डि.भोसले पाटील, राहुल चिताळकर पाटील, पोपटराव कुऱ्हाडे, विलासराव घुंडरे, रंगनाथ रानवडे, संजय घुंडरे, विलास कुऱ्हाडे, रमेश गोगावले, दिनेश वरुटे, आनंदराव मुंगसे, सचिन गिलबिले, दिनेश घुले, राहुल चव्हाण, अविनाश तापकीर, कैलास घेनंद, अरुण घुंडरे, संकेत वाघमारे, सतीश कुऱ्हाडे, अनिल वाघमारे, आशिष गोगावले तसेच पैलवान मंडळी व जय गणेश ग्रुपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

           कुस्ती ही महाराष्ट्राची गौरवशाली परंपरा आहे. कुस्तीची ही परंपरा जपली जावी, वृद्धिंगत व्हावी यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. या तालीम केंद्रामुळे कुस्तीची ही परंपरा नक्कीच जपली जाईल यासाठीच जय गणेश कुस्ती केंद्राची उभारणी करण्यात आली आहे असे जय गणेश ग्रुपचे अध्यक्ष व माजी उपनगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे यांनी सांगितले आहे.