Home Maharashtra क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले तथा युगप्रवर्तक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील प्रबोधनात्मक गितगायनांच्या मंचचे...

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले तथा युगप्रवर्तक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील प्रबोधनात्मक गितगायनांच्या मंचचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.सतीष वारजूकर यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन उद्घाटन… — माजी उपसभापती तथा चिमूर विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष रोशन ढोक यांची कार्यक्रमाप्रसंगी उपस्थिती.‌‌.

शुभम गजभिये

 विशेष प्रतिनिधी…

       काल रात्री चिमूर तालुक्यातील पळसगांव (पिपर्डा) येथे महात्मा जोतिबा फुले व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने बुद्ध-फुले-भिम गीतांच्या सांगितम कार्यक्रमाचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ सतिष वारजूकर यांच्या हस्ते पार पडले.

       याप्रसंगी चिमूर पंचायत समितीचे माजी उपसभापती तथा चिमूर विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष रोशन ढोक आवर्जून उपस्थित होते.

          राष्ट्रीय काँग्रेस पक्ष ओबीसी सेलचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष तथा चिमूर विधानसभा समन्वयक,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष-विरोधी पक्षनेते डॉ.सतिष वारजूकर यांनी महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवनकार्यावर सविस्तर मार्गदर्शन केले.

       यावेळी मुख्य अतिथी म्हणून उपस्थित चिमूर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष रोशन ढोक,मासळ सर्कल प्रमुख सुभाष बन्सोड,अखिल भारतीय बौद्ध महासभा शाखेचे अध्यक्ष कैलास खोब्रागडे,प्रभाकर गजभिये,नरेश पाटिल,मनोहर मेश्राम,हे सभामंचावर उपस्थित होते.

       संगीतमय प्रबोधनाच्या कार्यक्रमाला गावातील उपासक – उपासिका व गावातील नागरिक आणि महिला भरभरून उपस्थित होते.