Home Maharashtra नेरी येथील संदीप पिसेंचा विना नंबरचा वाळू भरलेला ट्रॅक्टर जप्त,चिमूर महसूलच्या भरारी...

नेरी येथील संदीप पिसेंचा विना नंबरचा वाळू भरलेला ट्रॅक्टर जप्त,चिमूर महसूलच्या भरारी पथकाची भारदस्त कारवाई…

शुभम गजभिये 

विशेष प्रतिनिधी…

चिमुर :- महसूल विभागाच्या भरारी पथकाने दि.१२ एप्रिलच्या पहाटे तीन वाजताच्या दरम्यान गोरवठ ते मोटेगाव मार्गावर रेती भरलेले ट्रकटर पकडून जप्तीची कारवाई केली.

         वाळू भरलेला विना नंबरचा ट्रॅक्टर नेरी येथील संदीप पिसेंच्या मालकीचा असल्याचे महसूल विभागाचे म्हणणे आहे.

       नेरी जवळील गोरवठ घाटावर मोठया प्रमाणात मुबलक पांढरी शुभ्र रेती आहे,या रेतीचा बांधकामांसाठी उपयोग केला जातो आहे.

        नेरी येथील तस्करांचा गोरवट नदीपात्रातील वाळू घाटांवर डोळा असून या घाटावरून मोठ्या प्रमाणात रेती चोरून तस्करांनी नदीला सपाट केले आहे.

       गोपनीय माहितीच्या आधारे गोरवठ ते मोटेगाव मार्गावर गस्त लावली असता पहाटे तीन वाजता दरम्यान नेरी येथील संदीप दयाराम पिसे यांचे वाळू भरलेले ट्रकटर आले असता त्याला रंगेहाथ पकडण्यात महसूल अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना यश प्राप्त झाले आहे.