Home देशविदेश सत्ता,धर्म आणि देश…

सत्ता,धर्म आणि देश…

1)सत्तेचा धर्म कोणता? 

2)धर्माचा धर्म काय?

3)देशाचा धर्म कोणता?

या तीन प्रश्नाचे उत्तर शोधणे गरजेचे आहे.कारण देश्यातील आम् जनतेच्या जीविताचे ,मालमत्तेचे आणि शांततेचे संरक्षणाचा प्रस्न जेंव्हा उभा राहतो,तेंव्हा वरील तीन प्रश्नाचे उत्तर शोधण्याची गरज वाटते.

    देश म्हणजे एक प्रकारचे उद्यानच असते.उद्यान याचा अर्थ विविधता.ज्या उद्यानात विविध प्रकारची फुले आणि झाडे वनस्पती असतात त्या उद्यानाचे वैभव वाढते,त्याचा दर्जा वाढतो,असे उद्यान माणसाच्या डोळ्याला आणि मनाला सुकून आणि शांती देतात,मानसिक शांती ही माणसाच्या शारीरिक.भुकेपेक्षाही अधिक निकडीची आहे,हे उद्यानातील म्हातारी माणसे ,लहान मुले ,स्त्रिया ,तरुण यांच्या वाढत्या संख्येवरून लक्षात येते.आणि जर एखादे उद्यानात केवळ एकाच प्रकारची फुले आली एकाच जातीची झाडे असती तर तिथे कुणीही फटकले नसते,नव्हे त्यास उद्यानही म्हणता येणार नाही.अगदी असेच देशाचे असते.भूतलावरील कोणत्याही देशात एकाच नसून विविध जातीचे आणि धर्माचे ,संस्कृतीचे ,सवयीचे , विचाराचे , राजकीय पक्षाचे,सामाजिक संघटनेचे लोक राहतात,याचा अर्थ देश म्हणजे एकप्रकाचे उद्यानच.अशी परिस्थिती,हे वास्तव चित्र ,हे सत्य असतांना ,सत्य हे का पचत नाही? का रुचत नाही ? या पेक्षा का पचू नये ,? आणि का रुचु नये ? असा सवाल केला पाहिजे.

   अशा स्थितीत देशाचा धर्म काय असावा ? याचे उत्तर म्हणजे देशाचा धर्म हा ” विविधतेत एकता ,” हाच असावा ,असे आहे.

दुसरा प्रश्न आणि त्याचे उत्तर असे…

धार्मिक या अर्थाने धर्माचा धर्म काय असावा ? आणि धर्माचा देश कसा असावा ? याचे उत्तर असे असले पाहिजे की,धर्माचा धर्म हा ” मानवता धर्म ” असावा.याचा अर्थ दया क्षमा शांती हे त्रिगुण धर्माचा पाया असला पाहिजे,तरच कोणताही धर्म टिकेल ,अन्यथा नष्ट होईल,हे धर्माचे भवितव्य आहे,असे माझे मत.म्हणून ज्याला कुणाला आपला रूढ धर्म टिकवायचा आहे,त्यांनी इतर धर्माच्या अस्तित्वाची जाणीव ठेवलीच पाहिजे,त्यांना शत्रू न मानता मित्र समजलेच पाहिजे,त्यांच्याबद्दलची बंधुत्वाची भावना ठेवलेच पाहिजे.पूर्वीचा काळ विसरा,आपण 21 व्या शतकात वावरत आहोत,बौद्धिक पातळी वाढली आहे,सायन्स पुढे गेले आहे,तंत्रद्यानात भरीव वाढ झाली आहे,याचा अर्थ जग बरेच पुढे गेले आहे,असे असताना आपण पहिल्या दुसऱ्या शतकात असल्या सारखे विचार ठेऊन चालणार नाही,रूढी ,परंपरा,संस्कृतीत बराच बदल झाला आहे,तरुण पिढी ही कधीही जून ते सोने न म्हणता नवे ते हवे म्हणताना दिसते.ही मानसिकता लक्षात घेऊन केवळ धर्म धर्म धर्म अशी जपमाळ जपण्याला काही अर्थ नाही की बोध नाही की फायदा नाही.उलट नुकसानच आहे.हे सनातनी विचाराच्या ,प्रतिगामी विचाराच्या लोकांच्या लक्षात येणे ही काळाची गरज आहे.हे लक्षात नाही आले तर,परिवर्तनाचे चक्र थांबत नसते,हेही सत्य आहे,पण त्याची गती कमी होते,प्रतिगामी विचाराच्या सत्ताधीशमुळे.

    तिसरा प्रश्न आणि त्याचे उत्तर…

सत्तेचा धर्म म्हणजे ” राजधर्म ” काय असला पाहिजे ? याचे उत्तर अटल बिहारी वाजपेयी नी,जेंव्हा गुजरात नरसंहार आणि हत्याकांड झाले,त्यावेळी मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान म्हणून रोखताना दिलेले उत्तर म्हणजे ” मोदी जी राजधर्म पळायला शिका .” याचा अर्थ सत्तेचा धर्म हा देशातील शांतता सुव्यवस्था संरक्षण ,” हाच सत्तेचा धर्म आहे.देशातील अनेक जाती पंथ धर्म संस्कृती यांचे स्वातंत्र्य आणि त्यांचे संरक्षण करणे,हा राजधर्म म्हणजेच सत्तेचा धर्म होय.केवळ सत्ताधाऱ्यांनी स्वतःचा धर्म ,किंवा देशातील बहुसंख्य असलेल्या धर्माची सत्ता म्हणजे राजधर्म सत्तेचा धर्म होऊ शकत नाही.उलट हा धर्मद्रोह ,देशद्रोह ,मानवता द्रोह होय.

    सत्य हे की,सत्तेला धर्म नसतोच.कारण देशाला धर्म नसतो म्हणून.देशाला आणि सत्तेला धर्म नसतो याचे कारण देशात विविध धर्माचे लोक असतात,ते देशाचे अपत्य असतात,त्यांची माता देशच असतो आणि पिता हा सत्ता असते.माता पित्याचे कर्तव्य हे आपल्या मुलांचे पालन पोषण करणे,त्यांचे हित जोपासणे,त्यांचे संरक्षण करणे,त्यांचे भवितव्य घडविणे हे सत्तेचे कर्तव्य म्हणजेच धर्म आहे.सत्तेचा धर्म म्हणजे एका धर्माशी अंगाशी आणि इतरांना पायाशी या नीतीने वागणूक देणे हा सत्तेचा धर्म होऊ शकत नाही.सत्ता आणि रूढ धर्म यांची दोस्ती न होता आणि शत्रुत्वपण न होता सत्तेने अलिप्त राहिले पाहिजे.धर्म आणि सत्तेची सरमिसळ होता कामा नये.तसे झाले तर सामाजिक राजकीय स्वास्थ्य बिघडते.देशात अराजक माजते.त्याचा त्रास सर्वानाच होतो, राजकार्ते पण त्याच्यातून सुटत नाहीत.

   सत्तेचा धर्म म्हणजे धार्मिक कार्य करणे नव्हे तर सामाजिक आणि आर्थिक विकासाची कामे करणे,हे सत्तेचा धर्म होय.देशातील गरिबी,भ्रष्टाचार,शेतकरी आत्महत्या,बलात्कार,महागाई ,बेकारी,सर्वांना समान दर्जेदार शिक्षण व आरोग्य देणे हे सरकारचे कर्तव्य आहे.देवळे पाडणे बांधणे,दोन जातीत ,दोन जातीत भांडणे लावणे हा सत्तेचा धर्म नसून लागलेली भांडणे मिटवणे आणि देशात शांती ठेवणे,देशातील प्रत्येक नागरिकास निर्भयतेने वावरण्याची ताकद विश्वास देणे हा सत्तेचा धर्म होय.

     तात्पर्य सत्तेचा ,धर्माचा ,देशाचा धर्म काय ? तो कोणता याची स्पष्टता प्रत्येक नागरिकास होणे ही वर्तमान काळाची गरज आहे.हाच उद्देश या लेखाचा आहे.

      लेखक : दत्ता तुमवाड…

          दिनांक: 10 एप्रिल 2025.

             फोन: 9420912209.