दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे
वृत्त संपादीका
१४ एप्रिल हा युगपुरुष डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा दिवस असतो.हा दिवस तमाम भारतीयांसाठी धार्मिक सणापेक्षाही मोठा उत्सवाचा असतो.
यादिवशी किंवा या दिवसांनंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान कार्याला अनुसरून विविध विषयांवर प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित केले जातात.
जगप्रसिद्ध प्रकांड पंडित डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून नागपूर येथील ठवरे काॅलोनी गार्डन येथे,१७ एप्रिल २०२५ ला” डॉ.बाबासाहेब आंबेडकर विशेष अभ्यासात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
“उपवर्गिकरण म्हणजे संविधानावर केलेला अघोषित हल्ला होय,या विषयावर सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता नितीन मेश्राम हे दिनांक १७ एप्रिल २०२५ रोज गुरुवारला सायंकाळी ७ वाजता उचित व अमुल्य मार्गदर्शन करणार आहेत.
या महत्त्वपूर्ण मार्गदर्शन कार्यक्रमाला हजारो नागरिक उपस्थित राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.



