Home Social प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्याचे शासनाचे आदेश…

प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्याचे शासनाचे आदेश…

    उपक्षम रामटेके 

मुख्य कार्यकारी संपादक…

     महाराष्ट्र शासनाचा जी.आर. (आदेश) आला आहे.प्रत्येक शहरातील तसेच गावातील ग्रामपंचायतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करणे क्रमप्राप्त आहे. 

     ज्या ग्राम पंचायती मध्ये युगपुरुष संविधान निर्माता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाणार नाही त्या ग्रामपंचायतीचे फ्लोटो किंवा व्हिडीओ शूट करून पाठविण्याचे आवाहन शासनातर्फे करण्यात आले आहे.

     तसेच त्या गावातील सरपंचानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

      एखाद्या ग्रामपंचायतमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली नाही तर का साजरी केली नाही ? याचे स्पष्टीकरण गावातील प्रतिष्ठित व्याक्तीने,पत्रकाराने,शिक्षकांने,तलाठी यांनी मोबाईल वरती शूटिंग घेवून http//bhartimaharashtra. gov.in या वेबसाईट वरती गावाचे नाव,तालुका,जिल्हा,सरपंचाचे नाव,ग्रामसेवकाचे नाव पाठवून द्यावे.

      जेणेकरून संबंधित संरपच ग्राम सेवक यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.ही पोस्ट लवकर गावागावांत पोहचली पाहिजे असे महाराष शासनाकडून कळविण्यात आले आहे.