Home Maharashtra चिमूर तालुका ई-रिक्षा असोसिएशन ने केले महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर...

चिमूर तालुका ई-रिक्षा असोसिएशन ने केले महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन…  — विवीध मान्यवरांचा सत्कार…

शुभम गजभिये 

विशेष प्रतिनिधी..

चिमूर :-

        चिमूर तालूका ई रिक्षा असोशिएशनच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले तथा विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती समारोह दि.११ एप्रील शुक्रवार ला सायंकाळी तहसिल कार्यालय चिमूर जवळ पार पडला.

       या कार्यक्रमाचे अध्यक्ष सामाजीक कार्यकर्ता धर्मदास गेडाम,प्रमुख पाहुणे सामाजीक कार्यकर्ता शुभम मंडपे,सुभाष पेटकर,गायक प्रकाश मेश्राम आदी उपस्थित होते.

      दरम्यान उपस्थित मान्यवरांची महात्मा ज्योतीबा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार सरणीवर प्रकाश टाकत अभिवादन केले.

      कार्यक्रमादरम्यान वयस्क रिक्षा चालक पुंडलीक गोठे व अनिल नवले यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. 

       कार्यक्रमानंतर लगेच एसएआरएस प्रस्तुत कराओके म्युजीकल गृप प्रस्तुत बुद्ध भिम गीताचां प्रबोधनात्मक कार्यक्रम गायक-गोकुल सिडाम,गायीका साक्षी कोसारे,आचल बारसागडे यांनी केला.

        कार्यक्रमाचे आयोजक अध्यक्ष सुरेश मेश्राम यांनी प्रास्तावीक व सुत्रसंचालन प्रकाश मेश्राम यांनी केले. 

      कार्यक्रमाला उपाध्यक्ष रोशन शेंबेकर,सचिव स्वप्नील हजारे,सदस्य रविंद्र नंदेश्वर,कुंदन टेंभुर्णे,अनिल नवले,अभिजीत बांडगे,विजय गोठे,राकेश मेश्राम,जगदिश रामटेके,प्रविण शेंडे,किशोर खोब्रागडे,वंदना घोनमोडे व सर्व ई-रिक्षा चालकांनी सहकार्य केले.