शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
चिमूर :- कलिंग युध्दामुळे मानवी जिवनाची क्षणभंगूरता सम्राट अशोकाला अस्वस्थ करून गेली व सम्राट अशोकानी आपले जिवन युध्दापासून बुद्धाच्या शांतीकडे वळवले व प्रजेच्या कल्याणासाठी आपले सर्वस्व अर्पन केले.
शक्ती व सामर्थ्याचा उपयोग केवळ विजयासाठी नव्हे तर मानवतेच्या कल्यानासाठी करता येते,”हाच बुद्धाच्या अहिंसा, करुणा,मैत्री,शांतीचा महान संदेश जगाला दिला,असे मानवतेचे-शांतीचे दुत सम्राट अशोक जगातिल ऐकमेव महान राजे ज्यानी बुद्धाच्या शिकवनीतुन राष्ट्र उभारणी करुन जगाला प्रेरणा दिली असे प्रतीपादन डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणेच्या समतादुत प्रज्ञा राजूरवाडे यांनी मागासवर्गीय मूलीचे शासकिय वस्तीगृह चिमुर येथे सम्राट अशोक जयंतीनिमित्त आपल्या प्रमुख मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गृहपाल मिरा काळे,प्रमुख मार्गदर्शक प्रज्ञा राजूरवाडे,पायल रामटेके संबोधि गेडाम आदी उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे आभार तनुश्री नगराळे यांनी केले.



