Home Social स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हेच जर खोटे बोलत असतील तर त्यांचे अनुयायी...

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हेच जर खोटे बोलत असतील तर त्यांचे अनुयायी खरे का बोलतील ? — विनायक दामोदर सावरकर यांच्या ‘ हिंदुत्व ‘ पुस्तकांमध्ये ते स्वतः म्हणतात…

           “हिंदुस्थान मे बहुत दिनो तक भ्रमण करने वाला चिनी यात्री व्हेनसॉंग हम लोगो को ‘ शिंतु ‘अथवा ‘ हिंदू ‘ ही कहता है.”(विनायक दामोदर सावरकर यांच्या हिंदुत्व या पुस्तकाची फोटोकॉपी खाली देत आहे आपण खात्री करून घ्यावी,फोटो कॉपी क्रमांक 1 पहा)

      वि.दा.सावरकर साहेबांनी जो चिनी बौद्ध प्रवासी व्हेनसॉंग भारतामध्ये सातव्या शतकामध्ये आला होता, त्यावेळी भारतात हर्षवर्धन हा बुद्धिस्ट राजा राज्य करीत होता. 

       या चिनी प्रवाशाने संपूर्ण भारतभर प्रवास केला आणि त्याने आपले प्रवास वर्णन लिहून ठेवले आज ते पुस्तक रूपाने आपल्याला उपलब्ध आहे.त्या पुस्तकामध्ये त्याने कुठेही भारताला हिंदुस्थान म्हटल्याचा उल्लेख नाही,किंवा या देशातील लोकांना त्याने हिंदू म्हटले नाही.

        तो चिनी प्रवासी होता चिनी भाषेत भारतासाठी जो शब्द उपलब्ध होता तोच त्याने वापरला होता त्याने हिंदुस्थान किंवा हिंदू हा शब्द कधीही वापरलेला नाही. 

      त्यावेळेस नालंदा विश्वविद्यालय अस्तित्वात होते जगातील विद्यार्थी या विश्वविद्यालयामध्ये शिक्षण घेण्यासाठी येत होते.याच नालंदा विश्वविद्यालयामध्ये या चिनी प्रवाशाने सहा वर्ष मुक्कामी राहून बुद्ध धम्माचे शिक्षण घेतले होते. नालंदा विश्वविद्यालय बुद्धिस्टांचे,राजा देखील हर्षवर्धन बुद्धिस्टच होता म्हणून हिंदू धर्म त्यावेळेस अस्तित्वातच नव्हता.

      तरी सुद्धा विनायक दामोदर सावरकर यांनी आपल्या हिंदुत्व या पुस्तकामध्ये म्हटलेले आहे की ,”व्हेनसॉंग हम लोगो को ‘शींतु’ अथवा ‘हिंदू’ ही कहता है.

      आता सावरकरांनी हे वरील वाक्य कुठून उचलले,तर या व्हेनसॉंग च्या च्या पुस्तकातूनच घेतले असेल हे निश्चित आहे. 

तर या चिनी प्रवाशाने आपल्या पुस्तकामध्ये हिंदू हा शब्द वापरला आहे का याची आपण तपासणी करून पाहूया-

       चिनी बौद्ध यात्री व्हेनसॉंग की भारत यात्रा ‘ या पुस्तकामध्ये त्याने स्वतः लिहिलेले आहे – “अनुसंधान से विधीत होता है की भारत का नामकरण भारतीय लोगो के सिद्धांतानुसार असंबंध और अनेक प्रकार का है. प्राचीन काल मे इसका नाम ‘ शिंटू ‘ हिनताव था, परंतु अब शुद्ध उच्चारण ‘ इंतु ‘ हैं.” व्हेनसॉंग याने हिंदू हा शब्दाचा उपयोग केलेलाच नाही,तरी जाणून-बुजून स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात त्या प्रवाशाने हिंदू हा शब्द भारतासाठी वापरला होता.मला प्रश्न पडतो ज्याला आपण स्वातंत्र्यवीर म्हणतो तो इतका खोटा प्रचार का करतो ?(व्हेनसॉंग च्या पुस्तकाची फोटोकॉपी खाली दिलेली आहे,फोटो कॉपी क्रमांक 2 पहा)त्यामध्ये कोणत्याही विद्वानाने हिंदू हा शब्द दाखवून द्यावा.

      आता ज्यांना आपण स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतो तेच जर खोटे बोलत असतील तर त्यांचे अनुयायी खरे बोलेल का ?

      सनातनी बुद्धिस्ट…

          प्रा.गंगाधर नाखले 

आज महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती म्हणजेच 11 एप्रिल 2025, 7972722081