Home Crime कार्यकारी अभियंता हरीश बोहरे अडकले लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात…

कार्यकारी अभियंता हरीश बोहरे अडकले लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात…

शुभम गजभिये 

  विशेष प्रतिनिधी 

     ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता हरीश बोहरे यांना आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti-Corruption Bureau) ४ लाख २० हजार रुपये लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे.हे प्रकरण संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडवणारे आहे.

      जिल्हा परिषदे अंतर्गत विविध कंत्राटदारांची वर्षभरापासून कामांची देयके थकवली जात आहेत.एकीकडे शासनाच्या योजनांखाली काम करणाऱ्या कंत्राटदारांना नाहक त्रास दिला जातो,तर दुसरीकडे अधिकारी आपली खुर्ची व पदाचा गैरवापर करून घरून पैसे देतो,अशी भाषा करत आहेत.हा प्रकार म्हणजे प्रशासनातील बेजबाबदार आणि भ्रष्ट मानसिकतेचे धक्कादायक उदाहरण आहे.

      कार्यकारी अभियंता हरीश बोहरे यांचा भ्रष्टाचार बाहेर आला असला तरी,असे किती अधिकारी अजूनही मुक्तपणे लाच घेत आहेत,याचा गंभीर विचार प्रशासनाने करणे आवश्यक आहे. 

         कंत्राटदारांचे थकीत पैसे थांबवून,त्यांच्याकडून लाच मागणं ही केवळ आर्थिक नव्हे तर नैतिक दिवाळखोरी देखील आहे.

         राज्य अभियंता संघटना चंद्रपूर, प्रशासनाकडे मागणी करते की,अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करावी,आणि कंत्राटदारांचे प्रलंबित देयके त्वरित अदा करावीत,जेणेकरून विकासकामे वेळेत पूर्ण होऊन जनतेला लाभ मिळू शकेल.