उपक्षम रामटेके
मुख्य कार्यकारी संपादक
सरकारी,खाजगी,कंपनीधारक कंत्राटदार हे शासकीय तथा प्रशासकीय मंजुरी अंतर्गत बांधकामे करीत असताना विना परवाना वाळूचा उपयोग चिमूर तालुकातंर्गत सर्रास करतांना दिसून येतात.
त्यांच्या वाळू चोरीवर नियंत्रण आणण्यासाठी चिमूर तहसीलदार श्रिधर राजमाने यांनी नियोजनबद्ध कार्यपद्धत अवलंबून त्यांना शासकिय किंमत नुसार वाळू उपलब्ध करुन द्यावी असे नागरिकांचे म्हणणे आहे.
चिमूर तालुकातंर्गत सर्व प्रकारचे कंत्राटदार हे विविध बांधकामांसाठी चोरीची वाळू वापरत असल्याचे वास्तव आहे.त्यांनी चोरीची वाळू बांधकामांसाठी वापरु नये म्हणून त्यांची विशेष कार्यशाळा घेणे आवश्यक आहे.
तद्वतच चोरीची वाळू शासकीय तथा प्रशासकीय मंजुरी असलेल्या सर्व बांधकामांसाठी वापरणार नाही असे प्रतिज्ञापत्र संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडून लिहून घेतले पाहिजे असेही मत नागरिकांचे आहे.
काही कंत्राटदार हे बांधकामातंर्गत चोरीची वाळू वापरीत असताना गावकऱ्यांनाच धमकावत असल्याचे सुध्दा पुढे आले आहे.कंत्राटदार हे चोरीची वाळू शासकीय तथा प्रशासकीय मंजुरी अंतर्गत बांधकामांत वापरत असल्यास त्यांना काळ्या यादीत टाकण्यात आले पाहिजे याही मताची जनता आहे.
काम कुठल्याही प्रकारचे असो वाळू संबंधाने तहसीलदार यांची परवानगी घेतलीच पाहिजे व शासकीय धोरणानुसार वाळूची लिज काढली पाहिजे.तरच कंत्राटदार हे वाळू चोर होणार नाही याकडे सुध्दा लक्ष देणे आवश्यक आहे.



