Home Social महामाया महिला सामाजिक न्याय संघटनेचा बौद्धगया येथील आंदोलनात सहभाग….

महामाया महिला सामाजिक न्याय संघटनेचा बौद्धगया येथील आंदोलनात सहभाग….

ऋग्वेद येवले

  उपसंपादक

दखल न्यूज भारत 

       बुद्धगया येथील महाबोध्द विहार बौद्धांच्या ताब्यात द्या, व 1949 चा ॲक्ट रद्द करा या मागणीकरिता भिक्खु संघाचा गेल्या 45 दिवसापासून आमरण उपोषण व धरणे सुरू आहे या आंदोलनात महाराष्ट्रातून महामाया सामाजिक न्याय संघटना साकोली तो भंडारा जिल्ह्यातील बहुतांशी कार्यकर्ते आंदोलनामध्ये सहभागी जाऊन उपोषणावर बसले.

         त्यामध्ये महामाया सामाजिक न्याय संघटनेचे संस्थापक डी जी रंगारी महामाया सामाजिक न्याय संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष शितल नागदेवे, महाराष्ट्राचे उपाध्यक्ष मीनाक्षी वाहने, विदर्भाची निशा मिश्राम, प्रतिमा राऊत, कमला रंगारी, वैशाली देशभ्रतार , कौतुका देशभ्रतार , मालता चौरे ,प्रीती बनसोड , ताराबाई डोंगरे व इतर महिला संघटनेचे बहुसंख्य कार्यकर्ते या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते.