Home Maharashtra पक्षा करिता निस्वार्थ कार्य करावे.:- खासदार डॉ.नामदेव किरसान… — गडचिरोली येथे...

पक्षा करिता निस्वार्थ कार्य करावे.:- खासदार डॉ.नामदेव किरसान… — गडचिरोली येथे पक्ष आढावा बैठकीला निरीक्षक ऍड.सचिन नाईक,खासदार डॉ. नामदेव किरसान,जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे,आमदार मसाराम सह जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांची उपस्थिती…

   उपक्षम रामटेके 

मुख्य कार्यकारी संपादक…

         राष्ट्रीय काँग्रेस पक्ष हा शहरासह तळागाळातील सर्व नागरिकांच्या हितासाठी कार्य करतो आहे.लोकांच्या रक्षणासाठी संघर्ष करतो आहे,वेळप्रसंगी रस्त्यावर उतरतो आहे,या पक्षात सर्वांना सामावून घेण्याची कार्यपद्धत सन्मान पुर्वक आहे,यामुळे राष्ट्रीय काँग्रेस पक्षासाठी निस्वार्थ काम पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी केले पाहिजे,अशा पध्दतीचे मार्मिक आवाहन खासदार डॉ.नामदेव किरसान यांनी गडचिरोली येथील पक्षाच्या आढावा बैठकीत केले आहे.

             काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ यांच्या सूनचने नुसार प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा गडचिरोली जिल्ह्याचे निरीक्षक श्री.सचिन नाईक,खासदार डॉ.नामदेवजी किरसान,जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे,आमदार रामदासजी मसाराम यांच्या प्रमुख उपस्थितीत गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीची आढावा बैठक संपन्न झाली. 

        उपस्थित मान्यवरांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून संघटन मजबूत करण्याच्या अनुषंगाने सूचना केल्या.

             निरीक्षक ऍड.सचिन नाईक सह इतर पदाधिकारी पुढील काळात जिल्हातील बाराही तालुक्याचा दौरा करून तालुकानिहाय आढावा घेतील व आगामी जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने बूथ मजबूत करून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील असे आढावा बैठकीतून समोर आले आहे.

           प्रदेश सचिव पंकज गुड्डेवार,प्रदेश सचिव रवींद्र दरेकर,अखिल भारतीय काँग्रेस पंचायत राज विभागचे सचिव अक्षय समर्थ,युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष ऍड.विश्वजित कोवासे,महिला काँग्रेस अध्यक्ष ऍड.कविता मोहरकर,माजी जि. प.अध्यक्ष अजय कंकडलावार, माजी जि.प.उपाध्यक्ष मनोहर पा.पोरेटी,शहर अध्यक्ष सतीश विधाते,जिल्हा उपाध्यक्ष समशेर खान पठाण,तालुकाध्यक्ष कुरखेडा जीवन पा.नाट, आरमोरी मिलिंद खोब्रागडे,वडसा राजेंद्र बुल्ले,चामोर्शी प्रमोद भगत,गडचिरोली वसंत राऊत,तालुकाध्यक्ष महिला काँग्रेस कल्पनाताई नंदेश्वर,धानोरा प्रशांत कोराम,एटापल्ली रमेश गंपावार,अहेरी पपू हकीम,मुलचेरा प्रमोद गोटेवार, भामरागड लक्ष्मीकांत बोगामी,परसराम टिकले,शंकरराव सालोटकर,दत्तात्रय खरवडे,राजेश ठाकूर,रजनीकांत मोटघरे,हनुमंतू मडावी,नितेश राठोड,प्रभाकर वासेकर,रमेश चौधरी मुस्ताक हकीम,रवींद्र पाल,विनोद लेनगुरे,घनश्याम वाढई,हरबाजी मोरे,अब्दुल पंजवानी,निजान पेंदाम,सुमेध तुरे,वैभव भिवापुरे,अनिल कोठारे,निकेश गद्देवार,नेताजी गावतुरे,नंदुभाऊ वाईलकर,प्रतीक बारसिंगे,रुपेश टिकले,ढिवरू मेश्राम,गुलाब मडावी,उत्तम ठाकरे,काशिनाथ भडके,देवाजी सोनटक्के,नितीन राऊत,भैय्याजी मुद्दमवार,कुसुम ताई आलाम,कविताताई भगत,अपर्णा ताई खेवले,आशा ताई मेश्राम,चारुदत्त पोहने,अनिल भांडेकर,निशांत वनमाळी,माजिद सय्यद,जावेद खान,प्रज्वल नागूलवार,राजाराम ठाकरे,जितू मुनघाटे,हेमंत मोहितकर,नरेंद्र डोंगरे,मिलिंद बागेसर,वर्षाताई गुलदेवकर,गीताताई वाळके,सुनिताताई रायपूरे,रिताताई गोवर्धन,आशाताई मेश्राम,पुष्पलताताई कुमरे,मंगलताई कोवे,मिलिंद बारसागडे,प्रफुल आंबोरकर,आनंद कांबळे,विपुल एलटीवार,गौरव येनप्रेड्डीवार,कुणाल ताजने,स्वप्नील बेहरे,प्रफुल बारसागडे,सुरज मडावी,सुधीर बांबोळे,चंद्रशेखर धकाते,प्रेमानंद गोंगले,विजय लाड,तेजस कोंडेकर,तारा गावडे,शेवंता हलामी,कुलदीप इंदूरकर,मनोज उंदीरवाडे यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी आढावा बैठकीला उपस्थित होते.