“शाही” याचा अर्थ सत्ता.एखादा भूभाग जिंकून त्यावर राज्य करणे म्हणजेच देशावर एखाद्या व्यक्तीचे खाजगी मालमत्ता म्हणून राज्य असणे म्हणजेच हुकुमशाही राजेशाही होय.
एखाद्या देशावर धर्माची सत्ता असणे,म्हणजेच देशाचे संविधान हे धार्मिक असणे,धर्माचे नियम देशाला,राजसत्तेला लागू करणे म्हणजे धर्मसत्ता होय.उदा.ब्राम्हण धर्म हा चातुर्वर्ण्य आणि मनुस्मृतीचे कायद्यानुसार चालतो,( यास हिंदुधर्म म्हणून अलीकडे म्हणण्याची प्रथा वैदिक ब्राम्हणांनी सुरू केली ).याचा अर्थ धर्माची सत्ता ही बायबल, कुराण,मनुस्मृती यानुसार चालविणे म्हणजेच ख्रिस्ती राष्ट्र,इस्लाम राष्ट्र,हिंदुराष्ट्र होय.युरोखंडातील देशात उदा.इटली,फ्रान्स,इंग्लंड येथे आधी ख्रिस्ती धर्माचे राज्य होते,म्हणजेच त्या धर्माचा धर्मगुरू हा राज्यसत्तेवर होता.कोणत्याही धर्माला मर्यादा असतात.ते विशिष्ट सीमेपलीकडे जात नाहीत,कारण तसे धर्माचे नियम,कायदे,बंधन असते.म्हणून राजकीय सामाजिक,आर्थिक ,सांस्कृतिक , वैज्ञानिक शोध लागतात,परिस्थिती बदलत असते,त्यानुसार समाज बदलत असतो,त्यानुसार राजसत्ता बदलत असते.पण धर्म बदलत नसतो,कारण धर्म हा लवचिक नसतो,तो ताठर ( rijid ) असतो.परंतु समाज जेंव्हा धर्मविद्रोह करतो,तेंव्ह धर्माची सत्ता जाऊन तेथे सामाजिक सत्ता प्रस्थापित होते.असेच पाश्चिमात्य राष्ट्रात घडले.त्याचे कारण तेथे अनेक शास्त्रज्ञ निर्माण झाले,त्यांनी अनेक शोध लावले,त्याचा उपयोग आम् जनतेला होऊ लागला.पण धर्माला धर्माच्या बाहेरचे ज्ञान विदन्यान,संशोधन या गोष्टी मान्य नसतात.कारण या बदल घडविणाऱ्या असतात,धर्माला बदल नको असतो.कारण तो प्रवाही प्रगतिशील नसतो,तर धर्म हा स्थितीशील असतो.सनातनी असतो.म्हणून तो पुरोगामी परिवर्तनवादी नसतो.म्हणून ज्याच्या मनावर धर्माचे साम्राज्य आहे,तो माणूस धर्माचेच गोडवे गात असतो,जुने ते सोने म्हणतो,परंतु आपल्याच हिताचे असले तरी नवे ते हवे असे म्हणत नाही.हे धर्माचे मागासलेपण होय.
युरोपियन देशातील ख्रिश्चन धर्म हा जातीत बंदिस्त नव्हता,तेथे व्यवसाय स्वातंत्र्य होते,म्हणून तेथे अनेक शोध लागले,येथील तंत्रद्न्यान पुढे गेले.तरी पण सत्तेत असलेला धर्मगुरू ” शास्त्रज्ञ गॅलिलिओ याने पृथ्वी स्थिर नसून ती सूर्याभोवती फिरते आणि सूर्य स्थिर आहे,तो फिरत नाही” असा शोध लावल्या मुळे त्यास धर्मसत्तेने आजन्म कारावास दिला.असे असले तरी त्या त्या देशातील जनतेनी इटालियन क्रांती,फ्रान्सची क्रांती,इंग्लंड क्रांती,अमेरिकन क्रांती घडवून आणली आणि धर्मसत्ता नाहीशी करून लोकशाही प्रस्थापित केली,म्हणजेच राजकीयसत्तेत बदल केला.धर्मगुरूची हुकुमशाही संपुष्टात येऊन तेथे लोकसत्ता आली.काही.हे ख्रिचन देशात घडले,असेच पाकिस्तान बांगला देशात घडले ,म्हणजे तेथे लोकशाही आली ,तरी पण तेथे धर्माचेच राज्य लोकांनी मान्य केले.आणि अरबराष्ट्रात मात्र अजूनही एकाच घराण्याची सत्ता म्हणजेच हुकुमशाही आहे, त्यांचेत मात्र काहीच बद्दल झाला नाही.त्या देशातील जनता अजूनही गुलामच आहे.लोकशाही क्रांती करण्याची ताकद त्यांच्यात नाही.
भारतात मात्र हिंदू धर्माच्या अनेक घराण्यांनी अनेक राज्य निर्माण केली,आणि स्वतःच राजा होऊन बसले.इथे अनेक देश आणि त्या देशात हिंदूंचेच राज्य म्हणजे हिंदुचाच राजा असायचा.सत्तेत धर्मगुरू नसायचा.म्हणून त्या त्या राज्याचे राज्य हे हिंदू धर्माचे म्हणून नसले तरी मात्र तो आपल्या राज्यात ब्राम्हण धर्माची राज्यघटनानुसार राज्य चालवायचा,म्हणजेच चातुर्वर्ण आणि जातीची उतरंड व्यवस्था.नेपाळमध्ये पण राजा हिंदूचा आणि राज्य ब्राम्हण धर्माचे,असेच चित्र परवा पर्यंत होते.आताशी कुठे लोकशाही आली.लोकांनी क्रांती केली,येथील कम्युनिस्ट पक्षांनी ती लोकशाही क्रांती घडविली.
ज्या ज्या देशात ख्रिश्चन आणि बौद्ध धर्म आहे त्या त्या देशात लोकशाही लवकर आली आणि स्थिरावली.आणि मुस्लिम देशात मात्र लोकशाहीचा अभाव आहे,याचे कारण तो धर्म इतर धर्माप्रमाणे लवचिक नाही.भारतातील ब्राम्हण जनता ( बहुतांशी ) धार्मिक ताठर असली तरी ती संख्येनी केवळ साडेतीन टक्केच आहे,मात्र इतर बहुजन हिंदू हे बहुसंख्य असून ते धार्मिकदृष्ट्या ताठर नाहीत,उदार उदात,सर्वसमावेशक आहेत,म्हणून इथे भारतीय संविधान 77 वर्ष टिकून आहे.मात्र अलीकडे हिंदु जनता वैदिक ब्राम्हण धर्माच्या आहारी गेल्यामुळे या देशात लोकशाही संपुष्टात येऊन सत्तेत वैदिक धर्म आपले स्थान मजबूत करताना दिसतो आहे.याचे कारण बहुजन समाजातील विचारवंत,पत्रकार,मध्यमवर्ग,कार्यकर्ते, राजकीय पक्षांचे आणि जातीचे पुढारी .
कोणत्याही देशाचा आर्थिक सामाजिक राजकीय सांस्कृतिक विकास व्हायचा असेल तर सत्तेत त्या त्या देशात धर्माची सत्ता नकोय,तर सामाजिक सत्ता हवीय.म्हणजेच लोकसत्ता म्हणजेच लोकशाही हवी,तरच देश सर्वार्थाने आणि खऱ्या अर्थाने देश समृद्ध आणि संपन्न होईल.



