राजेंद्र रामटेके
विशेष प्रतिनिधी…
एकलपूर, ता. ८ एप्रिल – मौजा एकलपूर येथील अंतोबा देवस्थान मंदिराच्या जवळ आमदार स्थानिक विकास निधीतून १० लाख रुपये खर्चाच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन आज आमदार रामदास मसराम यांच्या हस्ते संपन्न झाले.या कार्यक्रमाला ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद लाभला.
यावेळी आमदार मसराम यांनी सांगितले की, “ग्रामीण भागात रस्ते, वीज, पाणी या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे हेच आमचे ध्येय आहे. एकलपूरमधील या रस्त्याच्या कामामुळे नागरिकांचा प्रवास सुलभ होईल आणि देवस्थान परिसरात येणाऱ्या भाविकांनाही मोठा फायदा होईल.”
या कार्यक्रमाला उपसरपंच एकलपूर विजय शहारे,ग्राम प.स. ज्ञानदेव पिलारे,ग्राम प.स.देवानंद सयाम,ग्रामसेवक रवींद्र मेश्राम,विलास बन्सोड,सागर वाढई,चंदू दुपारे, ज्ञानेश्वर कुळमेथे,अरुण भागडकर,मनोज कोडवते,गोपाल भागडकर,राम मैंद,देवराव दुपारे,प्रमोद ठेंगरी,कालिदास भागडकर,हेमराज तूपटे,विवेक तूपटे,युवराज पिलारे,रामू उईके,तसेच स्थानिक अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामस्थांनी आमदार मसराम यांचे आभार मानले की त्यांनी दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या या कामाला मंजुरी देऊन तात्काळ निधी उपलब्ध करून दिला.कार्यक्रमाचे संचालन श्री. ज्ञानदेव पिलारे यांनी केले तर आभार उपसरपंच विजय सहारे यांनी केले.



