प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
शेतकरी म्हणजे महाराष्ट्र राज्यासह देशाचा श्वास आणि इज्जत आहेत.यामुळे त्यांना दुःखवू नका असा विनंम्र सल्ला राजकीय नेतृत्वांना,त्यांच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना,तद्वतच संबंधित राज्यकर्त्यांना आहे.
शेतकरी म्हणजे श्रम,शेतकरी अन्न,शेतकरी म्हणजे अमुल्य घाम,शेतकरी म्हणजे शक्ती,शेतकरी म्हणजे विश्वास,शेतकरी म्हणजे आदर,शेतकरी म्हणजे विनंम्रभाव,शेतकरी म्हणजे राजकीय व सामाजिक संघटनेचे बळ,शेतकरी म्हणजे या देशाचा आद्य घटक,शेतकरी म्हणजे या देशाचा चालक आणि वाहक,शेतकरी म्हणजे या देशाचे आर्थिक नाक,शेतकरी म्हणजे सहनशीलता व सहनशक्ती,शेतकरी म्हणजे मतदार,शेतकरी म्हणजे या देशाची सत्ता,शेतकरी म्हणजे उन्हातान्हात-पावसाळ्यात-हिवाळ्यात आणि रात्रंदिवस जमीन कसणारा लढवैय्या,शेतकरी म्हणजे सर्वांचे भविष्य,शेतकरी म्हणजे सुखदुःखात मी सोबतीला आहे म्हणणारा खरा मित्र,शेतकरी म्हणजे कुटुंबाला सांभाळताना हार न मानणारा आत्मविश्वास,शेतकरी म्हणजे बॅंकांची चल-अचल संपत्ती,शेतकरी म्हणजे राज्यकर्त्यांना दररोज उर्जा देणारी सर्व प्रकारच्या संस्था,शेतकरी म्हणजे शासनाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कर्ज घेण्यासाठी न बोलता सहमती देणारा आद्यम्य विश्वास,शेतकरी म्हणजे शिक्षण,शेतकरी म्हणजे काॅलेज आणि शाळा,शेतकरी म्हणजे धरणे,शेतकरी म्हणजे पाणी,जंगल,जमीन,शेतकरी म्हणजे नद्या,नाले,महासागर, आहे.यामुळेच ते या देशाचा श्वास आणि इज्जत आहेत हे लक्षात घेतले पाहिजे.
अर्थात शेतकरी हे सर्वांचे रक्षण करणारे सहकारी मित्र आहेत.म्हणूनच ते या देशातील सर्व मालमत्तेचे समान हक्कदार आहेत आणि सदर सर्व मालमत्तेचे संरक्षणकर्ते आहेत..
सर्व मोसमातंर्गत शेतकऱ्यांच्या श्रमांनी या देशाला तारले आहे आणि या देशाची इज्जत विविध प्रकारे शेतकऱ्यांनी झाकली आहे हे शासनकर्त्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे.
त्यांच्याकडून देशाला मिळणारा कर आणि त्यांच्या नावावर/हिंमतीवर देशविदेशातंर्गत घेण्यात येणारे विविध प्रकारचे कर्ज या देशाच्या विकासासाठी व कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी उपयोगात आणले जातात हे शासनकर्ता कसे काय विसरतात?
तद्वतच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कर्जाचा बोजा देशातील प्रत्येक नागरिकावर लादलेला असतो हे शासनकर्त्यांनी कधीच विसरू नये.
या देशातील शेतकऱ्यांच्या,शेत मजूरांच्या,मजूरांच्या,युवक-युवतीच्या,विद्यार्थ्यांच्या,महिलांच्या आणि,बेरोजगारांच्या बलावरच सरकारे चालत असतात याचे भान महाराष्ट्र सरकार सह देशातील केंद्र सरकारला असने अपेक्षित आहे.
यामुळेच शेतकऱ्यांसह देशातील नागरिकांच्या बलावरच विमान,हेलिकॉप्टर,लादिव्यांच्या फिरायला गाड्या राज्यकर्त्यांना,लोकप्रतिनिधींना,विशेष व्यक्तींना,उपलब्ध करुन दिल्या जातात आणि त्यांच्या सुरक्षेसाठी विविध प्रकारच्या सुरक्षा बलांची कुमक मागेपुढे उभी केली जाते हे प्रामुख्याने राज्यकर्त्यांना आणि ज्यांना ज्यांना सुरक्षा आहे त्यांना कळायला पाहिजे…
शेतकरी आणि या देशातील नागरिक हे देशातील राज्यकर्त्यांना व सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विविध करांच्या माध्यमातून भरभरून देतात,या मोबदल्यात सरकार काय देतोय हे त्यांनी स्पष्ट केलेच पाहिजे.
राज्यकर्त्यांना,लोकप्रतिनिधींना व इतरेत्र सर्वांना मानसन्मानचे जिवन जगण्याचे दिवस येतात ते या देशातील शेतकऱ्यांमुळे आणि नागरिकांमुळेच!
यामुळे मस्तवाल पणाची भाषा राज्यकर्त्यांकडून आणि इतरेत्र लोकप्रतिनिधींकडून शेतकऱ्यांच्या आणि नागरिकांच्या बाबतीत पुढे यायला नकोय हे सुद्धा त्यांनी सदैव लक्षात ठेवले पाहिजे.
शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी निवडणूक दिले म्हणून खासदार,आमदार,प्रधानमंत्री, मुख्यमंत्री,केंद्रीय मंत्री, केंद्रीय राज्यमंत्री,राज्यस्तरीय मंत्री, राज्यस्तरीय राज्यमंत्री झालात हे लोकप्रतिनिधींनी आदरपूर्वक मानले पाहिजे.
देशातील नागरिकांना,शेतकऱ्यांना,विद्यार्थ्यांना विविध योजना अंतर्गत शासनकर्ता सवलती देतात म्हणजे त्यांचा रुपया त्यांच्याच विकासासाठी देतात असे म्हणणे अनुसूचित किंवा चुकीचे नाही.
म्हणूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुक अंतर्गत स्वतःच्या जाहिर नाम्यातील तिसऱ्या क्रमांकाचा मुद्दा आठवावे आणि सत्तेवर आल्याबरोबर शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणार हे आश्वासन स्मरण करावे.
शेतकऱ्यांची कर्जमाफी करणे हा एकमेव पर्याय महाराष्ट्र राज्यकर्त्यांसमोर आहे.हा पर्याय त्यांनी गमावू नये…
तुर्त एवढेच!…



