उपक्षम रामटेके
मुख्य कार्यकारी संपादक
चिमूर :- चिमूर शहरा पासून अगदी जवळच ४ किलो मिटर अंतरावर असलेल्या नगरपरिषदच्या घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया प्रकल्प आगीच्या भक्ष्यस्थानी असल्याचे पुढे आले आहे.
घन कचरा व्यवस्थापन प्रकल्पाला शेत वनव्यामुळे आग लागल्याची घटना आज ७ मार्च २०२५ ला दुपारी ३ वाजता नंतर घडली असल्याची बातमी चिमूर शहरात व परिसरात वाऱ्यासारखी पसरली.
हवेच्या साह्याने नगरपरिषदच्या घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया प्रकल्पाला आगीने वेढा घेतलाय.आग लागल्याची माहिती मिळताच नगरपरिषदचे अग्निशमन दल घटना स्थळी तातडीने पोहचले असून आग विझविण्याचा आटोकात प्रयत्न सुरू आहे.
मात्र या आगीत नुकसान काय झाले हे अजूनही समोर आले नाही.



